99 satara sahitya samlen
⟵ Back to Home

About Us

साताऱ्यात मसाप शाहूुपुरी शाखेच्या १२ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर काही दिवसांपूर्वीच ९९ वे संमेलन साताऱ्यात होणार असल्याचे जाहीर झाले होते. तब्बल ३२ वर्षांनी होणाऱ्या या संमेलनामुळे सातारा जिल्हावासियांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी एकमताने सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निवड झाली आहे. त्यानंतर संमेलनाच्या तयारीने वेग घेतला असून विविध संस्थासमवेत बैठकाही झाल्या आहेत. संमेलन वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हावे यासाठी मसाप शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन प्रयत्नशील आहे. साताऱ्यातील साहित्य चळवळीला नवसंजीवनी देण्याचे काम मसाप शाहूुपुरी शाखेने केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंना एक लाख पत्रे पाठवणे असो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष निवड बिनविरोध करणे असो, साहित्याच्या व्यासपीठावरुन सामाजिक कार्याला मदत करणे असो असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. साताऱ्यात यापूर्वी ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १९९३ साली झाले होते. त्यावेळी स्वागताध्यक्ष स्व. श्री.छ. अभयसिंहराजे भोसले यांनी काम पाहिले होते. त्यानंतर होणाऱ्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष योगायोगाने त्यांचे सुपुत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आले आहे. या संमेलनाबाबत अखिल भारतीय साहित्य महामंडळाशी योग्य समन्वय रहावा आणि संमेलनाचे नियोजन उत्कृष्ट व्हावे यासाठी मार्गदर्शन समिती जाहीर करण्यात आली आहे.

 

 
🟢 WhatsApp