क्लिन इमेज- परवीन मेमन
मेरे हक मे जो बेहत्तर होगा वही मुझे मेरा खुदा देगा..!याची कायम जाणीव ठेवणाऱ्या पाचगणीच्या माजी नगराध्यक्ष सौ परवीन मेमन भाभी म्हणजे पाचगणीतील राजकारणाची 'क्लीन इमेज'...
पाचगणीच्या आर्थिक,राजकीय, सामाजिक,व्यावसायिक,औद्योगिक शैक्षणिक आदी सर्वच क्षेत्रात मेमन कुटुंबाचा नामोल्लेख टाळला तर पाचगणीची ओळखच पूर्ण होऊ शकत नाही. परवीन मेमन या कुटुंबाच्या प्रमुख घटक.लोकांची विविध माध्यमातून सेवा करणाऱ्या या कुटुंबाची सामाजिक ओळख वाढविण्याचे काम परवीन भाभींनी आजवर केले. आहे.'जिथे कमी तिथे नक्कीच आम्ही' या उक्तीनुसार भाभीनी आजवर बंद मुठ्ठीच्या माध्यमातून लोकसेवा केली आहे.2006 साली याच बंद मुठ्ठीची दखल घेऊन पाचगणीकरांनी भाभीना मोठ्या मताधिक्क्याने पाचगणी पालिकेत निवडून दिले.या निवडीनंतर पाचगणीत राष्ट्रवादी विचारांची सत्ता आली.सहकारी सदस्यांना बरोबर घेताना पदाच्या अभिलाषेपासून दूर राहून सहकाऱ्यांना संधी देणारी जेष्ठ भगिनी म्हणून भाभी नावारूपाला आल्या.२०११ मध्ये सहकारी सदस्यांनी मेमन यांच्या त्यागाची दखल घेऊन त्यांना नगराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली.या संधीचे त्यांनी अक्षरशः सोने केले.अथक पाठपुराव्याच्या माध्यमातून भाभींनी पाचगणीतील खराब रस्ते टकाटक करून घेतले.विविध पर्यटनस्थळांचे सुशोभीकरण केले.सत्ताधारी गटाची इमेज बिल्डिंग करण्यासाठी भाभिंची ही कारकीर्द उपयुक्त ठरली.एका 'कवडी'चाही स्वार्थ न साधणारी,कशाचीही 'मिंधी' नसणारी नगराध्यक्षा अशी त्यांची इमेज या वेळी जिल्हाभर पसरली.
यानंतर झालेल्या पंचवर्षीक निवडणुकीत भाभी पाचगणी सारख्या निवडणुकांमधील अर्थकारणाच्या किस्स्यानी धमाल घडविणाऱ्या शहरात चक्क बिनविरोध नगरसेविका झाल्या!त्यांना पाचगणीच्या राजकारणातून बाजूला करण्यासाठी अनेक क्लुप्त्या कुरघोड्या पाचगणीत घडल्या.त्यांची लढत व्हावी यासाठी चक्क देव पाण्यात ठेवण्यात आले.पण तरीही भाभी बिनविरोधच नवरसेविका झाल्या.भविष्यात असा बिनविरोध विक्रम पाचगणीसारख्या ठिकाणी होणे दुरापस्तच!यावेळी त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही..लोक सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले असताना भाभी मात्र आपल्या वॉर्ड मधील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या घराची आग विझवण्यात मग्न होत्या!या कातरवेळी त्यांनी शेजाऱ्याची आग विझवायला प्राधान्य दिले..!परिणामी पाचगणी मध्ये सत्तांतर झाले.या 5 वर्ष विरोधात राहून देखील भाभी पारदर्शी कारभार करत राहिल्या. 2016 साली त्यानी थेट नगराध्यक्ष पदासाठी जनतेकडे कौल मागितला!महिलेसमोर महिलेने लढावे असा त्यांच्या समर्थकांचा आग्रह होता.पण राष्ट्रवादी अंतर्गत कलहात हा विषय वादात अडकुन भाभीना अन राष्ट्रवादीला देखील अपयश पत्करावे लागले. यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून स्वतःला दूर ठेवले. पैशातून सत्ता अन सत्तेतून पैसा अन पुन्हा त्याच पैशातून पुन्हा सत्ता हा फंडाच त्यांना आवडला नाही,आवडत नाही!त्यामुळे त्यांनी पदासाठी स्वतःच्या तत्वांना तिलांजली वाहू न देता हार पत्करली.त्या सक्रिय राजकारणातून दूर गेल्या असल्या तरी त्यांची बंद मुठ्ठी अद्यापही अथकपणे कार्यरत आहे.परोपकाराचा सहकार्याचा आणि माणुसकीचा हा झरा अखंडपणे लोकांसाठी आजही झटतोय!!सत्ता असो वा नसो त्यांनी हाती घेतलेला हा लोकसेवेचा वसा हयातभर त्या सांभाळत राहतील हे मात्र नक्की!!
खरंतर,मैं भले ही वो काम नहीं करती
जिसमे खुदा मिले…
पर वो काम जरूर करती हूँ,
जिससे दुआ मिले...!यासाठी आणि पाचगणीच्या भल्यासाठी कायम कार्यरत राहणाऱ्या भाभींना लक्ष लक्ष शुभेच्छा!!!