पाचगणी प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक ४ अ च्या उमेदवार सौ.परवीन मेमन आणि ब चे उमेदवार शेखर कासुर्डे यांच्या विजयासाठी पाचगणीचे ग्रामदैवत घाटजाईदेवीला नागरिकांनी साकडे घातले आहे.सौ.मेमन यांच्या 'एअर कंडीशनर' आणि कासुर्डे यांच्या 'छत्री' या चिन्हाचा प्रभाग क्रमांक एक मध्ये जागर होत आहे.
पाचगणी नगरपालिकेतील 'क्लिन इमेज' असणाऱ्या सौ.मेमन यांनी कायमच पाचगणीच्या सर्वांगीण विकासाला अग्रक्रम दिला.शेखर कासुर्डे यांनी ना.मकरंद पाटील यांच्या माध्यमातून पाचगणी शहराला विकासाची निश्चित दिशा दिली आहे.पाचगणीच्या रखडलेल्या विकासाला गती देण्यासाठी कासुर्डे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी कंबर कसली आहे.
प्रभाग क्रमांक चार मध्ये सौ.मेमन यांच्या 'एअर कंडीशनर' आणि कासुर्डे यांच्या 'छत्री' च्या विजयासाठी तरुण,महिला आणि वयोवृद्धांनी कंबर कसली असून बहुमताने विजयी होण्याच्या दिशेने वाटचाल आहे.

 

तुमचे मत, प्रतिक्रिया किंवा संपर्कासाठी उजव्या हाताकडील व्हॉटसॲप बटनवर क्लिक करा