99 satara sahitya samlen
⟵ Back to Home

99 satara sahitya samlen

साता-यात उद्यापासून मराठी भाषा अभिजात दर्जा सप्ताह
साता-यात उद्यापासून मराठी भाषा अभिजात दर्जा सप्ताह

साता-यात उद्यापासून मराठी भाषा अभिजात दर्जा सप्ताह

सातारा / प्रतिनिधी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने मसाप, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यावतीने साता-यात शुक्रवार दि.3 ऑक्टोबर ते दि. 9 ऑक्टोबर  दरम्यान अभिजात दर्जा सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

पत्रकात, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मसाप पुणे, शाहुपुरी शाखेने पुढाकार घेऊन लोकचळवळ उभी केली होती. त्यासाठी दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन, पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांशी पत्रव्यवहार केला होता. या आंदोलनाला यश येऊन अखेर एक वर्षापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यापाठोपाठ मसाप पुणे, शाहूपुरी शाखेच्या सलग 12 वर्षाच्या पाठपुराव्याला यश येऊन साता-यात आता तब्बल 32 वर्षानंतर जानेवारी 2026 मध्ये 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेल्या वर्षपूर्तीनिमित्त विविध संस्थांच्या सहकार्याने मराठी भाषा अभिजात दर्जा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहाचे उद्घाटन शुक्रवार दि.3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यशोदा शिक्षण संस्थेच्या सहकार्याने दि. 3ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र माने यांच्याहस्ते उदघाटन होणार असून अध्यक्षस्थानी पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे तर प्रमुख पाहुणे यशोदा इन्स्टिट्युटसचे उपाध्यक्ष प्रा. अंजिक्य सगरे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशोद टेक्निकल कॅम्पस, इंजिनिअरिंग विंग च्या ब्ल्यू सेमिनार हॉलमध्ये होणार आहे.

व्दितीय पुष्प श्री.छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालय यांच्या सहकार्याने बुधवार दि.8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये होणार आहे. ज्येष्ठ कथाकार शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभिजात मराठी भाषा कथा सौंदर्य हा कार्यक्रम होणार असून शंकर पाटील, व.बा.बोधे, डॉ.राजेंद्र माने यांच्या कथांचे अभिवाचन वैदेही कुलकर्णी, डॉ. आदिती काळमेख, अजय गिजरे हे करणार आहेत.

मराठी भाषा अभिजात दर्जा सप्ताहाचा समारोप आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या सहकार्याने गुरुवार दि.9 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी ज्येष्ठ विचारवंत, लेखक किशोर बेडकिहाळ यांचे बोली भाषा ते अभिजात भाषा या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी मसाप,पुणे कार्यवाह शिरीष चिटणीस, आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ.वंदना नलावडे उपस्थित राहणार आहेत.

या मराठी भाषा अभिजात दर्जा सप्ताहास मराठी भाषेवर प्रेम करणा-यांनी, साहित्यिक रसिकांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले आहे.  

 

 

English Arabic Hebrew Polish Bulgarian Hindi Portuguese Catalan Hmong Daw Romanian Chinese Simplified Hungarian Russian Chinese Traditional Indonesian Slovak Czech Italian Slovenian Danish Japanese Spanish Dutch Klingon Swedish English Korean Thai Estonian Latvian Turkish Finnish Lithuanian Ukrainian French Malay Urdu German Maltese Vietnamese Greek Norwegian Welsh Haitian Creole Persian     Back Enable collaborative features and customize widget: Bing Webmaster Portal Back
🟢 WhatsApp