RTI activist sushant more
⟵ Back to Home

RTI activist sushant more

सुशांत मोरे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य
सुशांत मोरे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य

सुशांत मोरे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य

आई फाऊंडेशन


नोंदणीकृत कार्यालय - मु.पो.पिंपर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी.
मुख्य कार्यालय - ४, केशर कॉम्पलेक्स, ३४ पंताचा गोट, सातारा (महाराष्ट्र)
फोन नं. -०२१६२-२२२०८१, भ्रमणध्वनी - ९८५०४१११६३, ९४२०४९५२१८.


संस्थेविषयी थोडेसे


मानवी संस्कृतीच्या इतिहासात स्त्रीला आदिशक्तीचे स्थान आहे. या स्त्री शक्तीचे दर्शन वेळोवेळी वेगवेगळ्या रुपात घडले आहे. ती सरस्वती आहे, लक्ष्मी आहे, पार्वती आणि दुर्गा देखील आहे. ती सीता, राधा, द्रौपद्री आहे. राजमाता जिजाऊ आणि झाशीची राणी देखील आहे. तिच्या दैदिप्यमान कर्तृत्वाची पताका नेहमीच उंच फडकत आली आहे.
स्त्रीला पंख पसरु द्या निर्भयतेने ! तिला घेऊ द्या श्वास मोकळपणाने ! समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तिला पुढे आणण्याची गरज आहे. ही विकासाची वाट निवडून काही महिलांनी स्वत:च्या हिमंतीवर दमदार पावले टाकली आहेत आणि हे करताना महिलांना, वंचिताना मदतीचा हात दिला आहे. अनेक पुरुषही महिलांच्या सक्षमीकरणात त्यांना सन्मान मिळवून देण्यात सक्रीय सहभागी झाले आहेत. स्त्रीयांना त्यांचे अस्तित्व प्रतिष्ठेसह हवे आहे. ते शहरातील स्त्रीयांना हवे आहे आणि वाड्यावस्त्यावर, पाड्यांवरच्यांनाही. याकामी आई फाऊडेशन ही संस्था शैक्ष्णिक, सामाजिक, वैद्यकीय, कृषी, सांस्कृतिक क्षेत्रात स्त्रीला सर्वोच्च स्थान देणेकामी २००८ रोजी रत्नागिरी येथे स्थापन करण्यात आली आहे.
स्त्री शिक्षण, उद्योगधंद्यासाठी प्रशिक्षण, गरीब, गरजू, हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप बचतगट स्थापना, लेक वाचवा मोहीम, बालविवाह, हुंड निर्मुलन, मातृदिनी आदर्श मातांचा सत्कार इत्यादी क्षेत्रात संस्था प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. समाजात विधायक विचाराची प्रेरणा करणे, विविध कार्यक्रम प्रत्यक्ष राबवणे यातून आबालवृध्द स्त्री पुरुषांना आई फाऊंडेशन मदतीचा हात देत आहे.


संस्थेचे उपक्रम


आरोग्य शिबीर, शैक्षणिक कार्यक्रम, करिअर मार्गदर्शन, पर्यावरणविषयक कार्यशाळा, मातृदिनी आदर्श मातांचा सत्कार इ.
बचतगट निर्मिती, गृहउद्योग, व्यावसायिक प्रशिक्षण देणे.
महिला प्रबोधन मेळावे, व्याख्याने, पथनाट्य माध्यमातून प्रबोधन.
शासकीय व निमशासकीय योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ देणे
विधवा, परितक्त्या, निराधार महिलांना थेट मदत करणे, कायदेविषयक माहिती देणे.
कुपोषण, बालमृत्यू, व्यसनमुक्ती, दारुबंदी, बालकामगार विरोधी अभियान राबवणे.
भविष्यकालीन योजना
निराधार, निराश्रीत, कुमारी, माता, विधवा, परितक्त्त्या, निराधार, अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आर्थिक मदत करणे,
संस्थेचे स्व वास्तूत स्थालांतर, स्वत:चे प्रशिक्षण केंद्र व कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र करणे.
पाळणागर, बालगृह, सांस्कृतिक केंद्र, वाचनालय, विरंगुळा केंद्र सुरु करणे.

या उपक्रमासाठी काय करु शकता


सदर उपक्रमात सहभागी होण्यासाठी पालकांना मदतीसाठी आई फाऊंडेशन या नावाने धनादेश, डीडी स्वरुपात मदत करता येईल.
संस्थेच्या या कार्यात आपण यथाशक्ती रोख अथवा वस्तूरुप मदत करु शकता.
आपल्या प्रिय व्यक्तींच्या वाढदिवस अथवा स्मृतीदिन निमित्ताने कायम निधीची सोय करु शकता.
संस्थेच्या कार्यात आपल्या अमूल्य वेळेची मदत देऊ शकता.
देणगी देणाऱ्या व्यक्ती आयकर सवलत पात्र राहतील.

आई फाऊंडेशन, रत्नागिरी, विश्वस्त मंडळ


संस्थापक अध्यक्षा - सौ. सिध्दी सुशांत मोरे
उपाध्यक्षा - सौ. शारदा निळकंठराव काळे
सचिव - सौ. उषा प्रवीण येवले
खजिनदार - सौ. मिनाक्षी निलेश मोरे
सदस्या - सौ. सायली संतोष चाळके
सदस्या - सौ. सुरेखा राजेंद्र धाग
सदस्या - सौ. जयश्री जयवंत भोसले

भ्रमणध्वनी - ९५६१३१११६३
ईमेल -

 

स्वयंसेवी संस्थांचे क्रियाशील व्यासपीठ


दिशा विकास मंच


मुख्य कार्यालय - ४, केशर कॉम्पलेक्स, ३४, पंताचा गोट, सातारा. भ्रमणध्वनी - ९५६१३१११६३

संस्थेविषयी थोडेसे


महाराष्ट्रात आजवर अनेक स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट, मंडळ, फाऊंडेशन, असोसिएशन, वाचनालय इत्यादी धर्मादाय कार्यालयातील नोंदणीकृत स्थापन झालेल्या संस्था आहेत. या सर्व संस्थांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या नोंदणी, बदल अर्जाविषयी, आयकर सवलत, ऑडीट रिपोर्ट, प्रोजेक्ट रिपोर्ट इत्यादीविषयी दिशा देणेकामी साताऱ्यात दि. २ ऑक्टोबर २००६ रोजी दिशा विकास मंच या न्यासाची श्री.सुशांत मोरे यांनी स्थापना केली. सदरची संस्था मा. सहा. धर्मादाय आयुक्त साो यांच्या कार्यालयात नोंदणीकृत करण्यात आलेली आहे.
स्वयंसेवी संस्थांना योग्य दिशा देताना सर्व संस्थांची साखळी आवश्यक आहे. यासाठी आपण दिशा विकास मंचचे सभासदत्व घेऊन आपल्या संस्थेचा सर्वांगीण विकास घडविणे कामी एकत्र येऊ या. समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून विश्वस्तांना संस्था चालविताना शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी सोडविणेकामी महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात दिशा विकास मंचची कार्यालये सुरु करुन तेथे मार्गदर्शनाचे कार्य अविरत सुरु आहे.


भविष्यकालीन योजना


दिशा विकास मंचचे स्व वास्तूत लवकरच स्थलांतर
भव्य निवासी प्रशिक्षण केंद्र उभारणे.
शासकीय योजनांविषयी व संस्थांच्या मार्गदर्शनाविषयी मासिक सुरु करणे
दिशा विकास मंचसाठी आपण काय करु शकता.
संस्थेच्या या कार्यात आपण यथाशक्ती रोख अथवा वस्तूरुप मदत करु शकता.
आपल्या प्रिय व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त अथवा स्मृतीदिनाच्या निमित्ताने कायम निधीची सोय करुन त्यातील मिळणाऱ्या व्याजावर अन्याय, अत्याचारग्रस्त व्यक्ती व समूहाला न्याय मिळवून देणेकामी न्यायालयीन लढाईसाठी मदत करणे,
अन्याय, अत्याचारग्रस्त व्यक्ती व समूहासाठी लढाई लढताना आंदोलन, उपोषण इत्यादींना पाठिंबा देणे,
संस्थेच्या कार्यात आपल्या अमूल्य वेळेची मदत देवू शकता.
आपले दान दिशा विकास मंचच्या खात्यावर जमा करु शकता.
देणगी देणारी व्यक्ती आयकल सवलत पात्र राहील.
अल्पदरात रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध
नियोजित कार्यालय, निवासी प्रशिक्षण केंद्र.

संस्थेचे उपक्रम


१. सन २००६-२२०७ पासून दरवर्षी समाजातील अनेक गरीब, गरजू, वंचित, उपेक्षित घटकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचविणाऱ्या संस्थेचा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
सन २००६ साली वाटाड्या व सन २०१३ साली दिशा विकासाची या पुस्तकाचे प्रकाशन करुन संस्थांना आवश्यक असणारे दस्ताऐवज, शासकी व निमशासकीय कार्यालयाच्या योजनांचे परिपूर्ण पुस्तक उपलब्ध करुन दिले.
स्वयंसेवी संस्थांना येणाऱ्या अडीअडचणी विषयी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कार्यालयात तसेच भ्रमणध्वनीवरुन मोफत सल्ला व मार्गदर्शन करणे,
स्वयंसेवी संस्थांना विविध विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाव्दारे प्रशिक्षण देण्यात येते.
माहितीचा अधिकारी अधिनियम २००५ याविषयी प्रचार व प्रसार करुन प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार संपुष्टात आणणेकामी लोकशाही मार्गाने लढा दिला जातो.
विविध शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कृषी व सांस्कृतिक उपक्रम सेवाभावी वृत्तीने राबवत आहोत.
रुग्णांना अल्पदरात रुग्णवाहिकेची सुविधा संस्थेमार्फत सुरु आहे.
माहिती अधिकार अर्ज कसा भरावा, अपील कशी व कोठे करावी याचा मोफत सल्ला संस्थेच्या भ्रमणध्वनीवरुन दिला जातो.


विश्वस्त मंडळ


संस्थापक अध्यक्ष - श्री. सुशांत सुभाष मोरे,
उपाध्यक्ष - मनोज रवींद्र येवले,
सचिव - दिपक नारायण डफळे
खजिनदार - नंदकुमार जगन्नाथ कदम
सदस्य - राजेंद्र नामदेव गायकवाड
सदस्य - सौ. भागयश्री सुशीलकुमार कांबळे
सदस्य - सौ. विमल बाबुराव माने


मुख्य कार्यालय - ४, केशर कॉम्प्लेक्स, ३४ पंताचा गोट, सातारा. भ्रमणध्वनी - ९५६१३१११६३, ईमेल-

🟢 WhatsApp