NEWS & EVENTS

राजकीय

साताऱ्यात काँग्रेसला धक्का;

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माजी आमदार मदन भोसले यांचा भाजप प्रवेश

362.JPG

काँग्रेसचे माजी आमदार आणि किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांनी शनिवारी कारखाना कार्यस्थळावर डिस्टिलरीच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हा काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.
खंडाळा कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदन दादा आता जनतेचा आवाज ऐका अशी हाक दिली होती. तेव्हापासून मदन भोसले यांच्या भाजप प्रवेश बाबतच्या चर्चा रंगल्या. मात्र, यावर मदन भोसले यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय जाहीर करण्याची भूमिका घेतली.

दरम्यानच्या काळात रणजीत सिंग नाईक-निंबाळकर यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस कमिटीत येथे झालेल्या बैठकीला मदनदादा यांनी गैरहजेरी लावली होती. तसेच लोणंद येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेला त्यांनी दांडी मारली होती. त्यामुळे मदन भोसले आता भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना जोर आला होता.

किसनवीर कारखान्याच्या डिस्टिलरी उद्घाटन कार्यक्रमातच मधून दादा भाजपात प्रवेश करतील अशी चिन्हे होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच मदनदादा भोसले यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ते भावी आमदार असल्याचे सूचक वक्तव्य केले.
मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशाने सातारा जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. कार्यकर्त्यांनी मदन यांनी भाजपमध्ये जावे असाच सूर धरला. त्यानंतर किसन वीर कारखान्याच्या तिसर्‍या डिस्टीलरीच्या उद्घाटनाचे निमित्त साधत मदन भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित कार्यक्रमाला यावे, असा भोसले यांचा आग्रह होता. त्यानुसार किसन वीर कारखान्याच्या कार्यस्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते किसन वीर कारखान्याच्या तिसर्‍या डिस्टीलरीचे पूजन झाले.


https://www.youtube.com/embed/