गांधीजीच्या असहकार तत्वाचा यशस्वी करुन दाखवणारे व्यक्तिमत्व
भारतीय स्वातंत्र्यलढयाची दिशा महात्मा गांधी यांनी सुरु केलेल्या असहकार आंदोलनामुळे बदलली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुध्दा गांधीजींच्या या तत्वाचा अनेकांनी उपयोग केला. राज्यघटनेची अंमलबजवावणी सुरु झाल्यानंतर अनेकांनी लोकशीही मार्गाने आंदोलन करुन न्याय मिळवला. सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा. या जिल्हयातील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते सुशांत सुलभा सुभाष मोरे यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करुन अनेकांना न्याय मिळवून दिला. विविध प्रश्नांवर आवाज उठवून त्यासाठी साखळी, लाक्षणिक, बेमुदत उपोषण करुन अनेक प्रश्न मार्गी लावले.