NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

वाईत नगराध्यक्षपदासाठी ९ जण रिंगणात

राष्ट्रवादीची उमेदवारी डॉ.नितीन कदम यांना, भाजपकडून अनिल सावंत

35IMG-20251117-WA0066.jpg

अभिनेता तेजपाल वाघ, प्रवीण शिंदे अपक्ष विजय ढेकाणे यांनी आणली रंगत,  राष्ट्रवादीच्या रेखा कांताराम जाधव बिनविरोध


वाई / प्रतिनिधी


वाई नगरपरिषद निवडणुकीत वाई नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी ९ आणि नगरसेवकपदासाठी १०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी प्रभाग क्र. ९ अ मध्ये मकरंद पाटील गटाच्या रेखा कांताराम जाधव या बिनविरोध नगरसेविका झाल्या आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार निश्चित करण्यासाठी मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. शेवटच्या १५ मिनिटांत पक्षांकडून एबी फॉर्म देण्यात आल्याने अनेक इच्छुक उमेदवार प्रतीक्षेत राहिले आणि काहींच्या पदरात निराशा पडली. एकूण ११ प्रभागांतील २४ जागांसाठी तब्बल ११४ अर्ज दाखल झाले.


शेवटच्या दिवशीच ९६ अर्ज दाखल झाल्याने नगरपालिका कार्यालयात प्रचंड गर्दी, गोंधळ आणि शक्तीप्रदर्शनाचे वातावरण निर्माण झाले होते. काहींना पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. यामुळे निवडणुकीत बंडखोरांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.अर्ज माघारी घेण्यासाठी नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना रंगणार असून लढत अतिशय चुरशीची होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे अनिल सावंत, शिवसेना (शिंदे गट)चे प्रवीण शिंदे, शिंदे गटाचे योगीराज फाळके (अपक्ष), राष्ट्रवादी (शरद पावर गट)चे तेजपाल वाघ, प्रदीप जायगुडे राष्ट्रीय काँग्रेस , राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे डॉ.नितीन कदम, विजय ढेकाणे, व दीपक जाधव अपक्ष असे अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात असून एकूण ९ जणांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी नोंद झाली आहे. अनिल सावंत यांनी डबल फॉर्म भरल्याने संख्या नऊ झाली आहे शेवटच्या क्षणी झालेल्या गर्दीमुळे ऑनलाईन आणि समक्ष अर्ज प्रक्रियेत कर्मचार्यांना मोठ्या गोंधळाचा सामना करावा लागला. नगरपालिका परिसरात जत्रेसारखे वातावरण पाहायला मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार तेजपाल वाघ हे पूर्वी काँग्रेसमध्ये सक्रिय होते आज त्यांनी तुतारी चिन्हावर चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट कडून अध्यक्ष पदासाठी पदासाठी अर्ज दाखल केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून उमेदवारी करत असलेले नितीन कदम हे पूर्वी मदन भोसले यांचे कार्यकर्ते होते आणि भारतीय जनता पक्ष यांच्याकडून निवडणूक रिंगणात असलेले माजी नगराध्यक्ष अनिल सावंत हे पूर्वाश्रमीचे मंत्री मकरंद पाटील यांचे जवळचे कार्यकर्ते होते वाई नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना शिंदे गट वगळता अध्यक्ष पदासाठी आयात उमेदवार तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून कडून प्रवीण दिनकर शिंदे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून प्रदीप मारुती जायगुडे या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली आहे व उद्या सकाळी 11 वाजता अर्जाची छाननी होणार असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सोनाली मिटकरी यांनी माहिती दिली





नामदार मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बापुराव खरात आणि युगल घाडगे यांच्या अथक परिश्रमातून वाई नगरपरिषद प्रभाग क्र. ९ मध्ये रेखा कांताराम जाधव यांची बिनविरोध निवड शक्य झाली.