NEWS & EVENTS

राजकीय

९ कोटी शौचालयं, सव्वा कोटी घरं अंबानी-अदानींसाठी बांधली नाहीत: नरेंद्र मोदी

काँग्रेसला वढेरा-गांधी कुटुंबाविरोधातील खटले दाबायचे होते. ते स्वत:ला राजे-महाराजे समजत होते. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.

100Narendra-Modi-2.jpg

नवी दिल्ली, दि.29- मोदी सरकार अंबानी-अदानींसाठी काम करते, असा आरोप केला जातो. आम्ही अडीच कोटी लोकांपर्यंत वीज पोहोचवली. ९ कोटी शौचालयं, सव्वा कोटी घरं अंबानी-अदानींसाठी बांधली नाहीत, असे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या आरोपांना उत्तर देत त्यांचा समाचारही घेतला.

मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याचा दाखला दिला जातो. वाजपेयींच्या काळातही असे चुकीचे आरोप केले जात. मात्र, नंतरच्या अहवालात सर्वाधिक रोजगार त्या काळात निर्माण झाल्याचे समोर आल्यानंतर सगळे गप्प बसले. आज रस्ते बनत आहे. ऊर्जा क्षेत्रात मोठे काम होत आहेत. तिथे लोक काम करत आहेतच ना, मग त्यांना रोजगार मिळाला नाही का, असा उलट सवाल त्यांनी केला.

काँग्रेसला वढेरा-गांधी कुटुंबाविरोधातील खटले दाबायचे होते. ते स्वत:ला राजे-महाराजे समजत होते. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. गांधी कुटुंबीय आता कधीच सत्तेवर येणार नाही, असे भाकीत त्यांनी यावेळी वर्तवले. एकाच कुटुंबातील चार पिढी गरिबीवर चर्चा करत आली आहे. याच लोकांनी ५५ वर्षे देशावर राज्य केले. आज पुन्हा ते गरिबीवर बोलत आहेत. त्यांनी आता गरिबांसाठीची योजना जाहीर केली आहे. त्यांचे सरकार येणार नाही, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच ते असे बोलत आहेत.