वाई : पाचगणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या आज सातव्या दिवशी तब्बल २३ अर्ज दाखल झाले असून यामध्ये नगरसेवक पदाकरीता २२ अर्ज तर नगराध्यक्ष पदाकरीता १ अर्ज दाखल झाला आहे. तर एकूण अर्जांची संख्या ९३ वर पोहचली असून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. उद्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची होऊ शकतात यामध्ये भाजप प्रणित आघाडी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. असून रणांगणातील राजकीय धुमसचक्री स्पष्ट होईल
पाचगणी मरपृषदेकरिता प्रभागनिहाय अर्ज दाखल झालेले पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये नगराध्यक्ष पदाकरीता एकूण ९ अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदाकरीता ८४ अर्ज दाखल झाले आहेत.
प्रभाग क्रमांक १ (ब ) सर्वसाधारण महिला मधून राजश्री सणस, प्रभाग २ (अ ) अनुसूचित जाती महिला सोनल घाडगे, व सुप्रिया माने, प्रभाग ३ (अ) अनुसूचित जाती रुपेश बगाडे, आकाश बगाडे, (ब) सर्वसाधारण महिला प्रियंका जाधव, आशा बगाडे, विमल भिलारे, प्रभाग ४ (अ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नम्रता बोधे दोन अर्ज भरले, (ब) सर्वसाधारण शेखर कासुर्डे, प्रभाग ५ (अ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला शिल्पा माने दोन अर्ज भरले,( ब ) सर्वसाधारण सुनील बिरामणे, प्रभाग ८ (अ ) अनुसूचित जाती सचिन मोरे, व किरण रणपिसे, प्रभाग ९ (अ ) अनुसूचित जाती महिला सरोज कांबळे, (ब ) सर्वसाधारण रंजन कांबळे, प्रभाग १० (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महेश खांडके दोन अर्ज, दिलावर बागवान, (ब) महिला सर्वसाधारण महिला शशिकला कासुर्डे, अनुसूचित जाती आरक्षण नगराध्यक्ष पदाच्या प्रवर्गातून नगराध्यक्षपदासाठी अमोल सावंत,यांनी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस असून उद्या दाखल होणाऱ्या अर्जांची स्थिती स्पष्ट होईल तर निवडणूक रिंगणातील लढती कसा लढल्या जाईल ते अधिक स्पष्ट होईल.
प्रामुख्याने पाचगणी नगरपरिषदेची निवडणूक अपक्ष पद्धतीने लढली जाते. येथे पक्षीय निवडणूक आतापर्यंत यशस्वी झालेली नाही. तर उद्या भाजप पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीत पूर्ण पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचे बोलले जात होते. मात्र अद्यापि तसे निदर्शनास आलेले नाही. उद्या अखेरच्या दिवशी भाजप काय निर्णय घेते हे स्पष्ट होईल...


