NEWS & EVENTS

राजकीय

वाई नगरपालिका निवडणुकीसाठी एकूण पंधरा नामनिर्देशन अर्ज दाखल

81wai-nagarpailka.JPG

वाई / प्रतिनिधी


वाई नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नामनिर्देशन प्रक्रियेला आज पाचव्या दिवशी विविध प्रभागांसाठी आज एकूण दहा अर्ज दाखल झाले असून आजपर्यंत नगरसेवक  पदासाठी एकूण पंधरा अर्ज आणि नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज दाखल झाला आहे. पक्षीय समीकरणे बदलण्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. रविवार  दि. १६  नोव्हेंबर रोजी  प्रभागांमधून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. प्रभाग क्र. 2 (अ) मधून ज्ञानेश्वर दत्तात्रय सूर्यवंशी भारतीय जनता पार्टी मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्र. ४ (ब) कृष्णा जनार्दन भगत यांनी शिवसेनेतून आपल उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग क्र. ६ (अ) विमल प्रताप लोखंडे यांनी शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग क्र. ६ (ब) मधून महेश रामचंद्र गायकवाड यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार म्हणून नामनिर्देश पत्र दाखल केले. प्रभाग  क्र. ७ (अ) कुलदीप दिलीप शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच त्यांनी प्रभाग क्र. ७ (अ) मधून अपक्ष म्हणून सुध्दा उमेदवार अर्ज दाखल केला तर  दिलीप भीमराव शिंदे यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल केला आहे.  प्रभाग क्र. ७ (ब) मधून स्वप्नाली जयदीप शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग क्र. ८ (अ) मधून सुरेश शशिकांत देशमाने यांनी व प्रभाग क्र. ८ (ब) मधून पूनम विकास जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल केला. प्रभाग क्र. ९ (ब) मधून शंकर दत्ता खरात यांनी दोन अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. प्रभागनिहाय दाखल होत असलेल्या अर्जांवरून प्रमुख पक्षांमध्ये स्थानिक पातळीवरील रोखठोक स्पर्धा दिसून येत आहे. काल प्रभाग क्र. 10 (ब) मध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी आपली उपस्थिती जोरदारपणे दर्शवित दोन उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये योगेश आनंदराव फाळके व रूपाली योगेश फाळके या पती-पत्नीने एकाच प्रभागातून अर्ज दाखल केल्याने स्थानिक राजकारणात नवे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. ही रणनीती पक्षांतर्गत समन्वयाचा भाग की गटबाजीचे ध्योतक, याबाबत चर्चा सुरू आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज योगेश फाळके यांचा दाखल झालेला आहे. शनिवारी प्रभाग क्र. २ मधून भारतीय जनता पक्षातून पदमा संग्राम जाधव तर ९ (ब) मधून प्रदीप मारुती जायगुडे यांनी राष्ट्रीय काँग्रेस मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दाखल झालेले अर्ज नगराध्यक्ष पदासाठी एक तर आज पाचव्या दिवसा अखेर  ऐकून १५ अर्ज नगरसेवकासाठी दाखल झालेले आहेत. सोमवारी निवडणूक अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने प्रशासनासह नेत्याची तारेवरची कसरत पाहायला मिळणार आहे. प्रमुख पक्ष पूर्ण ताकदी निशी अर्ज दाखल करणार असल्याने पालिका प्रशासकीय कार्यासमोर प्रचंड गर्दी होणार आहे. अंतिम तारखेला अधिक उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वाई शहरात निवडणुकीची हवा चांगलीच पसरू लागली असून प्रमुख पक्षांनी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विकासकामे, मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्न या मुद्द्यांवर निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.