NEWS & EVENTS

Entertainment

अभिनय पाहिल्याशिवाय मुलालाही काम देणार नाही, आमिरची रोखठोक भूमिका

जुनैदनं 'पीके' मध्ये साहय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.

98aamir-.jpg

अभिनेता आमिर खान हा बॉलिवूडमधला सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’पासून सुरू झालेला त्याचा प्रवास ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’पर्यंत आला आहे. गेल्या काही वर्षांत ‘थ्री इडियट्स’, ‘सिक्रेट सुपरस्टार’, ‘दंगल’, ‘तलाश’ सारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती त्याने केली. आता आमिरचा मुलगा जुनैद खानही चित्रपटात पदार्पण करण्याचा विचार करत आहे. मात्र माझा मुलगा स्वत:ला सिद्ध करत नाही तोपर्यंत त्याला काम देणार नाही असं आमिरनं स्पष्ट केलं आहे.

जुनैदनं ‘पीके’ मध्ये साहय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे. अभिनयामध्ये त्याला अधिक रुची आहे मात्र अद्यापही अभिनयातील करिअरविषयी त्यानं आमिरशी चर्चा केलेली नाही. ‘माझ्या मुलासाठी योग्य भूमिका असेन तर नक्की त्याच्या नावाचा विचार केला जाईन मात्र त्यानं आधी ऑडिशन द्यावी अभिनयानं स्वत:ला सिद्ध करावं तरच त्याच्या नावाचा विचार केला जाईन, असं आमिरनं एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

‘माझी निर्मिती कंपनी असली तरी माझ्या मुलांना ऑडिशन हे द्यावंच लागणार’, असंही तो म्हणाला. आमिरचा लहान मुलगा त्याच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ या आगामी चित्रपटात दिसणार असल्याचंही म्हटलं जात आहे. यावरही आमिरनं आपली प्रतिक्रिया दिली आहे आझाद चांगला अभिनय करतो असं कास्टिंग डायरेक्टर म्हणाला तर त्याचा चित्रपटासाठी नक्कीच विचार केला जाईल असंही आमिरनं स्पष्ट केलं आहे.