सातारा, दि. 5- सातारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या आरे तर्फ परळी या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहाजे भोसले गटाने निर्विवाद सत्ता मिळवली. शिवसमर्थ ग्रामविकास आघाडीने सरपंचपदासह सर्वच्या सर्व 7 जागांवर विजय मिळवून प्रतिस्पर्धी काळभैरवनाथ पॅनलचा धुव्वा उडवला.
शिवसमर्थ ग्रामविकास आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार दीपक किसन महाडिक यांच्यासह सदस्यपदाचे उमेदवार सौ. आबिदा इकबाल काझी, सौ. उषा संदीप महाडिक, सौ. रुपाली भास्कर देशमुख, सौ. जयश्री लक्ष्मण महाडिक, अनिल अरुण देशमुख, रामदास प्रकाश गंधाले आणि सुरज संजय किर्तीकर हे विजयी झाले. या सर्वांचा सत्कार आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवाजी राजाराम महाडिक, विश्वासराव देशमुख, इकबाल काझी, मनोहर महाडिक, निलेश महाडिक, अरुण देशमुख, शिवाजी रामचंद्र महाडिक, दिलीप देशमुख, लक्ष्मण महाडिक, शामराव मोरे, दादासाहेब महाडिक, अॅड. भिमराव देशमुख, तातोबा भिसे, सुधाकर कदम आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी ग्रामस्थांना अपेक्षित विकासकामे करुन गावाचा कायापालट करावा. राजकारण हे निवडणूकीपुरते असते. त्यामुळे निवडणूक संपली असून यापुढे कोणताही गटतट असा भेदभाव न ठेवता कामकाज करुन सत्ताधार्यांनी ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा. आरे गावाच्या सर्वांगिण विकासासाठी आणि गावातील समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले असून यापुढेही आरे गावाच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी आरे ग्रामस्थांना दिला.
सातारा जिल्हा
आरे तर्फ परळी ग्रामपंचायतीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाचा झेंडा
सर्वच्या सर्व 7 जागांवर विजय


