सातारा, दि.१९- ग्रामीण भागातील गोर- गरीब आणि कष्टकरी जनतेच्या मुलांना तंत्रशिक्षणाची कवाडे खुली करुन देणार्या शेंद्रे येथील अभयसिंहराजे भोसले तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्युमधुन विविध कॉलेजच्या 120 विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. दरम्यान, एबीआयटी कॉलेज सातत्याने असे उपक्रम राबवत असून याचा लाभ सर्व तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा आणि त्यांना जगाच्या पाठीवर एक कुशल अभियंता म्हणून ओळखले जावे, अशा पध्दतीचे शिक्षण देणार्या एबीआयटी कॉलेजच्यामाध्यमातून सोमवार दि. 18 रोजी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्युचे आयोजन करण्यात आले होते. या उपक‘माचे उद्घाटन सौ. वेदांतिकाराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कॅम्पस इंटरव्ह्युसाठी टीई कनेक्टीव्हीटी इंडिया प्रा. लि., डेकोन, मॅग्ना इंटरनॅशनल, सेन्सेरा इंजिनियरींग लि., लियर कॉर्पोरेशन लि., एन्डूरन्स, पीवायएन, झेड एफ स्टीयरिंग गियर इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपन्यांमार्फत उपस्थित विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सोमवारी सुमारे 200 विद्यार्थी कॅम्पस इंटरव्ह्युसाठी उपस्थित होते.
यावेळी एबीआयटी कॉलेजचे प्राचार्य सतीश धुमाळ, बीएसए कॉर्पोरेशनचे एच.आर. मॅनेजर अजित लिमन, नितीन सावंत आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये 120 विद्यार्थ्यांना निवडण्यात आले असून त्यांना संबंधीत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, शनिवार दि. 23 रोजी सकाळी 10.30 वाजता कॅम्पस इंटरव्ह्यु होणार असून बारामती येथील पियाजो व्हेईकल लि. या कंपनीतील अधिकारी यासाठी उपस्थित राहणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून नोकरीची संधी मिळवावी, असे आवाहन प्राचार्य धुमाळ यांनी केले आहे.
सातारा जिल्हा
एबीआयटीच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमुळे 120 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी


