NEWS & EVENTS

Entertainment

मलायका-अर्जुन पुढील महिन्यात अडकणार विवाहबंधनात?

गेल्या वर्षभरापासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत आहेत.

52arjun-kapoor-malaika-arora.jpg

मुंबई, दि. ६ मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही बॉलिवूडमधली चर्चेत असणारी जोडी. गेल्या वर्षभरापासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत आहेत. ही जोडी पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत.

मलायका आणि अर्जुन एप्रिल महिन्यात ख्रिश्चन पद्धतीनं विवाहबंधनात अडकतील अशी माहिती द क्वींटनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. १८ वर्षांचा संसार मोडून मलायकानं २०१६ मध्ये अरबाज खानशी घटस्फोट घेतला. त्यानंतर हे दोघंही वेगळे राहू लागले. अरबाज खान सध्या इटालियन मॉडेल जॉर्जियाला डेट करत आहे. तर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

पहिल्यांदा एका फॅशन शोमध्ये दोघंही एकत्र दिसले होते तेव्हापासून या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशा चर्चा होत्या. सार्वजनिक ठिकाणी मलायका आणि अर्जुन एकत्र वावरत असले तरी या दोघांनीही आपल्या नात्याला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही. कॉफी विथ करण कार्यक्रमात अर्जुन कपूर मला आवडतो अशी कबुली तिनं दिली होती.