NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

अखेर त्या आयजींच्या चालकावर गुन्हा

21mahanews-logo-min.jpg

सातारा, दि. 18 – भुईंज परिसरात महामार्गावर एका पादचाऱ्याला ठोकरुन जाणाऱ्या मुंबईस्थित पोलीस महानिरीक्षकांच्या कार चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास सातारा तालुक्‍यातील म्हसवे गावच्या हद्दीत (एमएच 09 ईई 0108) या कारने दत्तात्रय शेवते या पादचाऱ्याला धडक देवुन पलायन केले होते. या धडकेत शेवते यांचा मृत्यू झाला होता.

स्थानिकांच्या जागृकतेमुळे आनेवाडी टोलनाक्‍यावर कारला थांबवुन भुईंज पोलीसांच्या ताब्यात दिले होते. मात्र भुईंज पोलीसांनी त्या कारमध्ये आयजी दर्जाचे अधिकारी असल्याने नरमाईची भुमिका घेत कार सोडून दिल्याने संताप व्यक्त केला जात होता. मात्र माध्यमांच्या दबावामुळे दुपारी चारला झालेल्या अपघाताची रात्री साडे दहाच्या सुमारास सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाला.