सातारा, दि. 6- नगर पालिका निवडणुकीत सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे म्हणून नगराध्यक्षपदासाठी सर्वसामान्य घरातील उमेदवार दिला. आता त्याच निकषाप्रमाणे लोकसभेला माझ्या सारख्या सर्वसामान्य युवकाचे नाव जाहीर करावे, असे आवाहन अभिजीत बिचुकले यांनी खा.उदयनराजे यांना केले आहे.
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना बिचुकले म्हणाले, खा.उदयनराजे यांची कॉलर उडविण्याची अदा आपल्याला आवडते. तसेच त्यांनी खऱ्या अर्थाने विधानपरिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला दणका दिला. त्यामुळे ते भीम आहेत. मात्र, आगामी निवडणूकीत मी हनुमानाच्या रूपाने उतरणार आहे. हनुमानाची टाकलेली आडवी शेपटी त्यांचा पराभव होण्यास कारणीभूत ठरणार आहे. कारण, यापुर्वीच्या झालेल्या दोन्ही लोकसभांच्या निवडणूकीत दिलेली आश्वासने ते पुर्ण करू शकले नाहीत. त्यांच्या भोवती असलेली असलेली चौकडी माझ्या विरोधात वावटळे उडवत आहे. मात्र, मी यंदाच्या निवडणूकीत खासदार नक्की होणार आहे, असे बिचुकले यांनी सांगितले.
सातारा जिल्हा
सातारा लोकसभेसाठी माझे नाव जाहीर करा
अभिजीत बिचकुले यांची मागणी


