कोल्हापूर, दि. 17- विदर्भ—मराठवाडय़ात कृत्रिम पाऊस पाडण्याची निविदा प्रक्रीया पूर्ण झाली आहे. येत्या महिन्याभरात अंदाज घेऊ न हा कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी दिली.
यंदा पावसाने उशिरा दर्शन दिले. त्यानंतर गेले पंधरा दिवस जोरदार पाऊस पडला आहे. मात्र, विदर्भ—मराठवाडय़ात अपेक्षेपेक्षा कमी पाऊ स पडला आहे. शेतीची कामे खोळंबली आहेत. याचा अंदाज आल्याने मे महिन्याच्या अखेरीस महसूल मंत्री पाटील यांनी दुष्काळावर उपाय म्हणून राज्य सरकार लवकरच कृत्रिम पावसाचे प्रयोग करणार असल्याची घोषणा केली होती. कृत्रिम पावसाचे हे प्रयोग जास्तीत जास्त मराठवाडय़ात करण्यात येतील,असेही ते म्हणाले होते. आता पावसाने उघडीप दिली असून विदर्भ—मराठवाडय़ात पावसाची चिंता व्यक्त केली जात आहे.
याबाबत आज मंत्री पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले, कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. त्याची निविदा मागवण्यात आली असून तीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे महिन्याभरात अंदाज घेऊ न हा कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार आहे. कृत्रिम पावसाबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी नमूद केले.
सौजन्य - लोकसत्ता ऑनलाईन
तंत्रज्ञान
विदर्भ-मराठवाडय़ात महिन्याभरात कृत्रिम पावसाचा प्रयोग – चंद्रकांत पाटील
कृत्रिम पावसाचे हे प्रयोग जास्तीत जास्त मराठवाडय़ात करण्यात येणार


