NEWS & EVENTS

राजकीय

भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांचा निर्णय

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आज मोठी घोषणा केली

92prakash-ambedkar-20180478254.jpg

अकोलाः भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आज मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. तसेच लोकसभा निवडणूक ही वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली लढणार असल्याचा निर्धारही आंबेडकरांनी बोलून दाखवला आहे.

भारिप बहुजन महासंघ या नावाशी माझं भावनिक नातं असलं तरी पुढची वाटचाल ही वंचित बहुजन आघाडी म्हणूनच होणार असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, देशात दबावतंत्र आणि ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरू आहे. स्मृती इराणी यांनी गांधी परिवारावर जमीन घोटाळ्यात केलेले आरोप हे दबाव आणि ब्लॅक मेलिंगचा प्रकार आहे. तुम्हाला घोटाळ्यांची माहिती होती तर कारवाई का केली नाही, असा प्रश्नही त्यांनी भाजपाला विचारला आहे.


https://www.youtube.com/embed/