NEWS & EVENTS

Entertainment

Bigg Boss Marathi 2 : मला बाहेर काढा – अभिजीत केळकर

'बिग बॉस मराठी'च्या घरातील स्टोअर रूममधून अभिजीत केळकर अचानकच गायब झाला.

82abhijeet-kelkar.jpg

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्टोअर रूममधून अभिजीत केळकर अचानकच गायब झाला आणि सदस्यांना तो नक्की कुठे गेला आहे हे समजत नव्हते. काही सदस्यांना वाटले की हा टास्कचा भाग असावा आणि या घटनेनंतर घरात मर्डर मिस्ट्री हा टास्क सुरु झाला. शुक्रवारी अडगळीच्या खोलीमधून अचानक अभिजीतचा “मला बाहेर काढा” हा आवाज आल्यावर सगळेच दचकणार आहेत. शिव, वीणा, वैशाली आणि इतर सदस्य धावत बाहेर येतात. अभिजीत मला बाहेर काढा इतकंच म्हणतो त्यामुळे शिव आणि वीणासोबतच इतर सदस्यांचीही घाबरगुंडी उडते.

रुपालीकडे वैशाली आणि शिवने वारंवार चावी मागितली पण त्यावर रुपालीने काहीच उत्तर दिले नाही. शिव म्हणाला त्याला बाहेर काढायचे आहे, हा टास्कचा भाग नाहीये. तरीही रुपालीचे काहीच उत्तर नाही म्हणून शिवचा पारा चढला. आम्ही तुला मदत केली हे विसरू नकोस असं तो तिला म्हणतो.

रुपालीच्या मनात नक्की काय सुरु आहे? ती चावी देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.