NEWS & EVENTS

राजकीय

सातारा जागेसाठी भाजप आग्रही

63chandrakant-patil.jpg

वाई. दि. 14– संपूर्ण देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाला अतिशय चांगले वातावरण निर्माण झाले, परंतु शिवसेनेशी युती असल्याने ज्या मतदार संघात भाजपला सुबक वातावरण आहे, अशा मतदार संघावर शिवसेनेने दावा केल्याने भाजपची कोंडी झाली आहे, तरीही लोकसभेसाठी सातारा मतदार संघ हा भाजपला मिळविण्यासाठी मी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्रेष्ठींकडे आग्रह धरणार असून तो नक्कीच भाजपला मिळेल असा दृढ विश्‍वास राज्याचे महसूलमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी वाईमध्ये खाजगी भेटी नंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.

युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राकेशजी फुले, उपशहराध्यक्ष प्रशांत नागपूरकर, देवानंद शेलार, राहुल घाटगे, पश्‍चिम भागाचे जेष्ठ नेते बापूसाहेब शिंदे, अशोकराव वाडकर, ब्रह्मदेव वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. पाटील म्हणाले, देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी भाजपने नोट बंदीचा धाडसी निर्णय घेतला तो जनतेने मान्य केला, परंतु विरोधकांच्या तो पचनी पडला नाही. देशातील भारतीय जनता पक्षाने जनतेच्या हिताचे अनेक धाडसी निर्णय घेवून लोकहिताच्या अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावातापुढे संपूर्ण महाआघाडी नेस्तनाबूत झालेली आहे.


https://www.youtube.com/embed/