NEWS & EVENTS

राजकीय

अबे ओ सांबा..आपके पिछे कितने गब्बर छूपे हैं?, आशिष शेलार धनंजय मुंडेंवर बरसले

रक्तात राष्ट्रवाद असलेल्या पक्षाला सोडून फक्त नावात राष्ट्रवाद असलेल्यांच्या नादी लागलेले..स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार करणारे...धनंजयराव चिडले?

82shelar-munde.jpg

मुंबई, दि.29- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार करणारे …धनंजयराव चिडले? लेकीन अबे ओ सांबा..आपके पिछे कितने गब्बर छूपे हैं.. ?, अशा शब्दात त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी गुरुवारी ट्विटरवरुन टीका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलारांना मंत्रिपदाची आस दाखवून कसे झुलवत ठेवले. शिवसेनेविरोधात त्यांचा कसा वापर करुन घेतला आणि आता शिवसेनेबरोबर युती झाल्यामुळे शेलारांना कसे जुळवून घ्यावे लागत आहे, अशा आशयाचे हे ट्विट होते.

धनंजय मुंडे यांच्या ट्विटनंतर आशिष शेलार यांनी देखील शुक्रवारी ट्विटरच्या माध्यमातूनच पलटवार केला आहे. ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात, रक्तात राष्ट्रवाद असलेल्या पक्षाला सोडून फक्त नावात राष्ट्रवाद असलेल्यांच्या नादी लागलेले..स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार करणारे…धनंजयराव चिडले? लेकीन अबे ओ सांबा..आपके पिछे कितने गब्बर छूपे हैं.. ?वो तो देखलो !..लढ धन्नो..!!.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. एक नातू म्‍हणाला आजोबा आजोबा निवडणुका तुम्‍हीच लढवा…दुसरा नातू म्‍हणाला आजोबा आजोबा मीच “पार्थ” मीच लढणार…आजोबांना होती ताईंची काळजी…दादांना पोराची.. जाणते आजोबा नातवंडांसमोर मुके.. मुके.. मुके.. आजोंबाच्‍या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके.. धुके, असे त्यांनी म्हटले होते.