NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

चंद्रमुखी कार्यक्रमाने सातारकर झाले मंत्रमुग्ध

कोळीगीते,भक्तीगीते,संतदर्शन आणि अनेक देखाव्यांचे सुरेख सादरीकरण

514--chandramukhi3-min.jpg

सातारा, दि. ४ - मुंबई येथील निर्मात्या सौ.रोशनी म्हात्रे व दिग्दर्शक संतोष लिंबोरे यांचेसह सुमारे 40 कलाकारांनी संत दर्शन,लोकगीते व कोळीगीतांचा चंद्रमुखी हा बहारदार कार्यक्रम सादर करत तीन तास सातारकरांना मंत्रमुग्ध करुन सोडले.

सातारा येथील श्री नटराज मंदीराच्या महारुद्र,महाशिवरात्री संगीत व नृत्यमहोत्सवात मुंबई येथील जय प्रोडक्शन संस्थेच्या सौ. रोशनी म्हात्रे निर्मित आणि संतोष लिंबोरे दिग्दर्शित चंद्रमुखी या बहारदार कार्यक्रमाचे आयेेाजन नटराज मंदिराचे मार्गदर्शक सुधाकर शानभाग यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतुन साकारले गेले.हा यावर्षी सलग दुसर्‍यांदा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नटराज मंदिराच्या महाशिवरात्री महोत्सवाच्या प्रमुख संयोजिका सौ. उषा शानभाग, वे.मु.जगदीश भट व सुधाकर शानभाग यांच्या हस्ते रंगमंच पुजन करुन कलाकारांनी नटराज मंदिरातील परमपूज्य शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामी कला मंदंीराच्यापुढे उभारण्यात आलेल्या भव्य स्टेजवर आपल्या नृत्यकार्यक्रमाचा प्रारंभ गणेश वंदनेवरील बहारदार सामुहिक नृत्य सादर करुन केला.त्यानंतर या कार्यक्रमात पहाटेची जात्यावरची गाणी, वासुदेव, राधाकृष्णाची गवळण, विविध देव देवतांची साक्षात रुपे त्यामध्ये कालीमाता,महालक्ष्मी, वज्रबाहू हनुमान, जटाधारी भगवान शंकर,जय मल्हार,अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईंबाबा, पंढरपूरचा विठोबा आदी संताचे हुबेहुब रुपातील दर्शन प्रेक्षकांना घडवले.डोळ्ंयाचे पारणे फेडणारी वेशभूषा व या कलाकारांनी साकारलेल्या या संतांच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनाचा ठावच घेतला. अशी दर्शन घडवतच ..एकवीरा आई तु डोंगरावरी..कार्ल्याच्या डोंगरावर.. चांदंण, आली रात.. अशी एकसे बढकर एक कोळी गीते याशिवाय उधळीत ये रे गुलाल.. ही नटखट गवळण, खंडेराया.. लख्ख पडला प्रकाश.. चला जेजुरीला जाउ.. मल्हारवारी..खेळ मांडियेला,..विठूचा गजर.. माउली, माउली. ..लल्लाटी भंडार..ही भक्तीगिते अतिशय ठेक्यात आणि सुरेखपणे सामुहिक नृत्यावर सादर होताना 3 तासांपेक्षा जास्त काळ कधी लोटला हे कळलेच नाही. स्मशानातील जटाधारी शंकर व जागरण गोंधळाचे कालीचे थरकाप उडवणारे नृत्य अनेकांना भावले.
संतोष लिंबोरे यांनी या कार्यंक्रमाचे सुरेख निवेदन केले. या कार्यक्रमात निलेश जोशी, विजय करर्जावकर, शशांक पाटील, हेमंत अहिरे, नम्रता वेसविकर, प्रतिभा वाघमारे, सुनिता राजगिरे, अश्‍विनी नारकर यांना आदींनी सुरेख गायन केले.तर नृत्यामध्ये शशीकांत जाधव, रिद्धेश म्हात्रे,कविता घडशी,नयना रणदिवे, अस्मिन कामठे, अनुष्का नारकर यांनी बहारदार नृत्ये सादर केली.कार्यक्रमात विविध वाद्यांची सुरेख साथ जयंत साळके, संदीप डावरे, निखील महाराव, अभिजीत मोरे, ओंकार जोंधळे व संकेत चाळके यांनी केली. तर उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था सुरेश मोरे यांची आणि प्रकाशयोजना कल्पेश माने यांची होती. हा कायर्ंक्रम सुरु असताना यावेळी चित्र काढणार्‍या शौर्य साळुंखेचा सत्कार प्रशस्तीपत्रे देउन करण्यात आला.

चंद्रमुखी मधील नृत्य,गायन व वादनामध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकारांंचा सत्कार मंदिराचे वतीने सौ. उषा शानभाग, करसल्लागार चंद्रकांत शहा यांचे हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्रे देवुन करण्यात आला.यावेळी नटराज,मंदीराचे विश्‍वस्त रमेश शानभाग,मुकुंद मोघे,रणजीत सावंत,के.नारायण राव,,मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन,,सौ. आँचल घोरपडे,राहूल घायताडे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.पत्रकार अतुल देशपांडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले.