NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

चंदूकाका सराफ आणि सन्स प्रा.लि. चा कार्पो-सोशल उपक्रम स्तुत्य - वर्षा देशपांडे

‘मिशन आद्या’ अंतर्गत विविध महिला संघटनांना सॅनिटरी नॅपकिन्से मोफत वितरण

78chandukakak-photo29-1.jpg

सातारा, दि. 29- आजच्या काळात प्रत्येक कार्पोरेट कंपन्या या केवळ आपला फायदा कसा होईल याचाच विचार करताना दिसत आहेत. पण चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स यांनी केवळ आपल्या फायद्याचा विचार न करता ज्या समाजातून आपण आलो आहोत त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी केलेले कार्पो-सोशल उपक्रम खरोखच स्तुत्य असल्याचे उद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी काढले.

चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि. यांचे वतीने आयोजित मिशन आद्या या उपक्रमा अंतर्गत विविध महिला संघटनांना सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वितरण कार्यक्रमा वेळी अॅड. देशपांडे बोलत होत्या. यावेळी इनरव्हील क्लब सातारा कॅम्पच्या अध्यक्षा गीता पटेल, उपाध्यक्षा किर्ती साळुंखे, माजी अध्यक्ष मिनाज मुलाणी, सेजल नावंधर, कन्याशाळेच्या सुजाता गेंगजे, डॉ. सुभाष जाधव, नितीन दोशी, हणमंत जगदाळे, अॅड. शैलजा पाटील , सुनिल चाणेकर, रूपेश शर्मा, राहुल देशपांडे व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना गीता पटेल म्हणाल्या की, भारतात पाळीच्या काळातील स्वच्छता ही अतिशय भीषण समस्या आहे. एका अंदाजानुसार आजही महाराष्ट्रातील केवळ 17 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. बाकी स्त्रिया अन्य घातक मार्ग वापरुन अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. ही सामाजिक समस्या ओळखून चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि. ने सुरु केलेला ‘मिशन आद्या’ उपकम अतिशय स्तुत्य आहे.

यावेळी बोलताना चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स चे सुनिल चाणेकर म्हणाले की, गेली 190 वर्षे शुध्दता, परंपरा आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि. यांनी ‘मिशन आद्या’ सुरु केले आहे .‘मिशन आद्या’ अंतर्गत गरजू महिलांना 2 लाख मोफत सॅनिटरी नॅपकिन्स पुरवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि. ने आतापर्यंत ज्याप्रमाणे विविध सामाजिक कामात सहभाग नोंदवला आहे त्याचप्रमाणे ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मोहिमेला समाजातून सुध्दा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा.लि. च्या सर्व शोरुममध्ये विविध क्षेत्रातील अनेकांनी सॅनिटरी नॅपकिन्स दिले. हे सर्व सॅनिटरी नॅपकिन्स समाजातील गरजू महिलांपर्यंत पोहचवले जाणार आहेत.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार चंदुकाका सराफ अॅन्ड सन्सचे क्लस्टर हेड रूपेश शर्मा यांनी केला.