NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा.लि.चा उपक्रम स्तुत्य – अभिनेत्री करिश्मा कुलकर्णी

‘मिशन आद्या’ ला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद

34CSPL-Satara-Road-.JPG

सातारा, दि. ११ - भारतात पाळीच्या काळातील स्वच्छता ही अतिशय भीषण समस्या आहे. एका अंदाजानुसार आजही महाराष्ट्रातील केवळ 17 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन्स वपरतात. बाकी स्त्रिया अन्य घातक मार्ग वापरुन अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. ही सामाजिक समस्या ओळखून चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि. ने महिला दिनापासून सुरु केलेला ‘मिशन आद्या’ उपक्रम स्तुत्य असल्याचे मत अभिनेत्री करिश्मा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

गेली 190 वर्षे शुध्दता, परंपरा आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि. येत्या महिला दिनापासून ‘मिशन आद्या’ सुरु केले आहे त्यांचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या. यावेळी सप्लायर चेन मॅनेजमेंट हेड सौ. संगीता शहा, विनिता गजरे, चेतना बिडवे, निकिता गुप्ता, ममता राजाराम, महिला कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या. ‘मिशन आद्या’ अंतर्गत गरजू महिलांना 2 लाख मोफत सॅनिटरी नॅपकिन्स पुरवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यात चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा.लि. च्यावतीने 1 लाख सॅनिटरी नॅपकिन्स या मोहिमेसाठी देण्यात आले.


चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि. ने आतापर्यंत ज्याप्रमाणे विविध सामाजिक कामात सहभाग नोंदवला आहे त्याचप्रमाणे ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मोहिमेला समाजातून सुध्दा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा.लि. च्या सर्व शोरुममध्ये विविध क्षेत्रातील अनेकांनी सॅनिटरी नॅपकिन्स दिले. हे सर्व सॅनिटरी नॅपकिन्स समाजातील गरजू महिलांपर्यंत पोहचवले जाणार आहेत. स्त्रीच्या उत्तम आरोग्यासाठी चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा.लि. ने उचलले पाऊल अनेकांना मार्गदर्शक ठरेल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.


https://www.youtube.com/embed/