कवठे – होणार होणार म्हणत असताना एकदाची मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाची तारीख मिळाली असून किसन वीर सहकारी साखर कारखाना लि. भुईंजच्या कारखानास्थळावरील गेले आठवडाभर सर्वांना उत्सुकता असलेला कार्यक्रमाची अंतिम तारीख 9 मार्च असल्याचे फ्लेक्स आज सर्व गावांमधून लागले आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम 9 मार्चला कारखाना स्थळावर होणार असून याची जंगी तयारी कारखाना स्थळावरील भव्य मंडपामुळे जाणवत आहे.
किसन वीर कारखान्याच्या तिसऱ्या डीस्टीलरीचा भव्य उद्घाटन सोहळा, पुलवामा येथे शहीद झालेल्या शूर जवानांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारण्यात येत असलेल्या अमर जवान स्मारकाचे भूमिपूजन व अमर जवान उद्यानात वृक्षारोपण असे या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहणार आहेत. 9 मार्चला असलेल्या या कार्यक्रमाची वेळ सकाळी 10 वाजता असल्याचे सोशल मीडियावरून व्हायरल होत असून मदनदादा या कार्यक्रमात नेमकी काय भूमिका घेतात याची उस्तुकता संपूर्ण जिल्हाभर लागली आहे. महिनाभर सुरु असलेला मदनदादा भाजपमध्ये प्रवेशकर्ते होणार की कॉंग्रेसमध्येच राहणार याविषयी खात्रीशीर वृत्त या कार्यक्रमामध्ये समजणार आहे.
राजकीय
मुख्यमंत्री शनिवारी “किसन वीर’मध्ये
मदनदादांच्या प्रवेशाबाबतच्या औत्सुक्याने कार्यक्रमात येणार रंगत


