कराड, दि. 16- कराड पालिकेने वाढीव घरपट्टीची बिले कराड मधील सर्व रहिवाशांना पाठवली ओहत. सदर निवासी व वाणिज्य कर ही अवास्तव व अवाजवी असलेचे दिसून येत आहे. चतुर्थ वार्षिक संकलित कर वाढीत टोकाची असमानात आहे.
काही मिळकत धारकांची अल्प वाढ झाली आहे तर जादा मिळकतधारकांची दुप्पट, चौपट प्रमाणात करवाढ झाली आहे. तरी याबाबत विचार करून मिळकतधारकांना दिलासा द्यावा, असे निवेदन कराड किराणा भुसार व्यापारी असोसिऐशनच्यावतीने ग्राहक संरक्षण विभागास देण्यात आले आहे.
निवेदन असोसिएशनच्यावतीने ग्राहक संरक्षण विभागाचे धनंजय खैर यांना असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मोटे यांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, संकलीत कर वाढ करणेकरीता मिळकतींची मापे घेण्याकरीता नेमण्यात आलेल्या ठेकेदारांच्या लोकांनी चुकीची मोजमापे घेतलेली आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक यंत्रांनी घेतलेली मापे चुकीची आहेत. जुन्या मिळकतीत वाढीव बांधकाम किंवा बदल नसतानाही करवाढ केलेली नाही.
गावठाण व टाऊन प्लॅनिंग मधील मिळकतींची करवाढ करताना कोणतीही मुलभूत समानता नाही किंवा टक्केवारी नाही. मुलभूत सुविधांचा वापर हा गावठाण व टी. पी. मधील रहिवाशी हा समानच करीत असतात तरी सुध्दा टी. पी. मधील मिळकतधारकांवर अतिरिक्त करवाढीचा बोजा टाकला जातो.
ंतरी या कराबाबत अभ्यासपूर्ण विचार करून मिळकतधारकांना दिलासा द्यावा, असे पत्रकात म्हटले आहे. याबाबतचे निवेदन कराड जिल्हाधिकारी, पालिका मुख्याधिकारी, नगराध्यक्षा यांना देण्यात आले आहे.
सातारा जिल्हा
संकलित कराबाबत किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे निवेदन


