NEWS & EVENTS

राजकीय

काँग्रेसने अफवा पसरवू नयेत, युपीत सर्व जागा लढवण्यास ते स्वतंत्र : मायावती

काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातही पूर्णपणे स्वतंत्र आहे. त्यांनी इथे सर्व ८० जागांवर उमेदवार उभे करुन एकट्याने निवडणूक लढवावी.

68mayawati-1.jpg

लखनौ, दि. 18- उत्तर प्रदेशात काँग्रेसने आघाडीसाठी सपा-बसपाला ७ जागा सोडल्याच्या वृत्तानंतर बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती या चांगल्याच भडकल्या आहेत. युपीत काँग्रेससोबत आमची कुठलीही आघाडी झालेली नाही, हे मी पुन्हा एकदा मी स्पष्ट करते असे त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे.

मायावती म्हणाल्या, बसपाकडून पुन्हा एकदा स्पष्ट करते की, उत्तर प्रदेशसहित संपूर्ण देशभरात काँग्रेसला आमचे कोणतेही समर्थन नाही किंवा त्यांच्याशी कोणतीही आघाडी झालेली नाही. आमच्या लोकांनी काँग्रेस पक्षाकडून पसरवण्यात येणाऱ्या कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पुढच्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातही पूर्णपणे स्वतंत्र आहे. त्यांनी इथे सर्व ८० जागांवर उमेदवार उभे करुन एकट्याने निवडणूक लढवावी. आमची आघाडी (सपा-बसपा) एकटी भाजपाला पराजित करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. त्यामुळे काँग्रेसने जबरदस्तीने उत्तर प्रदेशात सपा-बसपा-रालोदला ७ जागा सोडल्याची अफवा पसरवू नये.