NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि. च्यावतीने महिला दिनापासून ‘मिशन आद्या’

गरजू महिलांना 2 लाख मोफत सॅनिटरी नॅपकिन्स पुरवण्याचे उद्दिष्ट

69cs-jwellers.jpg

गेली 190 वर्षे शुध्दता, परंपरा आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि. येत्या महिला दिनापासून ‘मिशन आद्या’ सुरु करत आहे. या अंतर्गत गरजू महिलांना 2 लाख मोफत सॅनिटरी नॅपकिन्स पुरवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यात चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा.लि. च्यावतीने 1 लाख सॅनिटरी नॅपकिन्स या मोहिमेसाठी दिले जाणार आहेत.

मासिक पाळीबद्दलचा संवाद हा पारंपारिक गैरसमजुती, रुढी, पंरपरा यापासून दूर जात स्त्रीत्वापर्यंत येऊन पोहचला आहे. बराच दीर्घ पल्ला गाठला असला तरी अजूनही खूप काही शिल्लक आहे. भारतात पाळीच्या काळातील स्वच्छता ही अतिशय भीषण समस्या आहे. एका अंदाजानुसार आजही महाराष्ट्रातील केवळ 17 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन्स वपरतात. बाकी स्त्रिया अन्य घातक मार्ग वापरुन अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. ही सामाजिक समस्या ओळखून चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि. ने आतापर्यंत ज्याप्रमाणे विविध सामाजिक कामात सहभाग नोंदवला आहे त्याचप्रमाणे ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येत्या 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचे आरोग्य सुधारावे हा उद्देश ठेवून गरजू महिलांना 2 लाख मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ‘मिशन आद्या’ सुरु करण्यात येणार आहे. ज्यांना या मोहिमेसाठी नॅपकिन्स द्यायचे असतील त्यांनी चंदूकाका सराफ अॅन्स सन्स प्रा.लि. च्या शोरुममध्ये ठेवलेल्या विशेष बॉक्समध्ये नेऊन ठेवावेत असे आवाहनही चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि. च्यावतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी www.iamaadya.in किंवा 1800 2670999 या क्रमांकवर कॉल करावा. स्त्रीच्या उत्तम आरोग्यासाठी हे छोटसं पाऊल चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा.लि.च्यावतीने उचलण्यात आले असून ‘पुढाकार घ्या बना आद्या’, ‘मी आहे आद्या’ अशी मोहीमही राबवण्यात येत आहे. वंचित वर्गातील महिलांना सॅनिटरी उत्पादने उपलब्ध करुन देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून सर्वांनी त्यात सहभाग नोंदवावा असे आवानही चंदूकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि. च्यावतीने करण्यात आले आहे.


https://www.youtube.com/embed/