सातारा, दि. १९– सातारा लोकसभेची आचारसंहिता साताऱ्यात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर येथील प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर कौटुंबिक न्यायालय सुरू होत असल्याने इमारतीलगतचे ऊसाचे गुऱ्हाळ व पाच टपऱ्या हटवण्यात आल्या. सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शनिवारी दुपारी ही धडक कारवाई केली. ही कारवाई सलग तीन तास सुरू होती.
अतिक्रमण हटाव पथकाचे निरीक्षक शैलेश अष्टेकर, प्रशांत निकमं दहा कर्मचारी टिपर व इतर यंत्रणा दुपारी बारा वाजता घटनास्थळी दाखल झाली. प्रशासकीय इमारतीच्या पश्चिम दिशेला व सातारा स्टॅण्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर भिंतीलगतची टपऱ्यांची अतिक्रमणे काढण्यात आली तसेच त्यालगतचे उसाचे गुन्हाळ सुध्दा काढण्यात आले. इमारतीच्या तळमजल्यावर येत्या काही दिवसात कौटुंबिक न्यायालय सुरू होत आहे. न्यायालयाच्या शंभर मीटरच्या परिसरात अतिक्रमणं नसावीत या नियमामुळे अतिक्रमण हटाव पथकाला अतिक्रमण हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार या टपऱ्या हटवण्यात येऊन सातारा स्टॅंण्ड ते राष्ट्रवादी कार्यालय रस्ता मोकळा करण्यात आला.
सातारा जिल्हा
प्रशासकीय इमारतीजवळील अतिक्रमणे हटवली
सातारा पालिकेची कारवाई; वडापवाल्यांचा प्रश्न कायम


