NEWS & EVENTS

राजकीय

लोकसभा महासंग्रामाची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता

एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान वेगवेगळया टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात.

70unnamed.jpg

नवी दिल्‍ली - यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. कारण, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज रविवारी संध्याकाळी ५ वाजता दिल्लीतील विज्ञान भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. सहा ते सात टप्प्यात या निवडणुका होतील अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणाही होण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू होईल. दरम्यान, आता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे देशाचे लक्ष लागले आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव असला तरी लोकसभेच्या निवडणुका ठरलेल्या वेळीच होतील असे निवडणूक आयोगाकडून एक मार्च रोजी स्पष्ट करण्यात आले.एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान वेगवेगळया टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात.


https://www.youtube.com/embed/