NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

विकासकामांना गती देण्याचा निर्धार - प्रवीण शिंदे

वाई शहरासाठी कोट्यवधींचा निधी; शिवसेनेची पत्रकार परिषद

54186994-finvahogbr-1676642311.jpeg

वाई -  शिवसेना (एकनाथ शिंदे गट) वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भिलारे, उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे विधानसभा प्रमुख प्रतापराव भिलारे शिवसेना कामगार सेना  जिल्हाप्रमुख योगेश फाळके वैद्यकीय तालुकाप्रमुख सचिन पेटकर  शिवसेना वाई शहर प्रमुख  गणेश सावंत व  नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रवीण शिंदे यांनी वाई शहरातील विकासकामां बाबत महत्त्वाची माहिती दिली.


वाईकरांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर 
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व तालुकाप्रमुख रवींद्र आप्पा भिलारे यांनी सांगितले की जिल्हा नियोजन निधीतून ₹2 कोटी 12 लाख नगरविकास खात्यातून कचरा निर्मूलन प्रकल्पासाठी ₹5 कोटी अशुद्ध पाणी शुद्धीकरणासाठी एसटीपी लाईनसाठी 22 कोटी किवरा ओढ्यावरील बंधाऱ्यासाठी 3 कोटी असा एकूण कोट्यवधी रुपयांचा निधी शिवसेनेच्या माध्यमातून वाई शहराला मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले भविष्यातील मोठी कामे : प्रवीण शिंदे यांची भूमिका उमेदवार प्रवीण शिंदे म्हणाले, “वाई शहरासाठी आधुनिक आणि अद्ययावत 100 खाटांचे कार्डिओलॉजी हॉस्पिटल उभारण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. घाट सुशोभीकरण, शहरात स्वच्छ हवा, स्वच्छ व सुंदर वाई हे आमचे ध्येय आहे.” तसेच पार्किंग प्रश्न, वाहतुकीची कोंडी, रखडलेली भाजी मंडई, किवरा ओढा पूल, नाट्यगृहासाठी परत गेलेला साडेतीन कोटींचा निधी, कृष्णा नदी शुद्धीकरण प्रकल्प, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, नाना-नानी पार्क यांसारखे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.



शिवसेना : “80% समाजकारण, 20% राजकारण” 


पत्रकार परिषदेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे म्हणाले शिवसेना नेहमी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करते. भाजपाशी युतीसाठी प्रयत्न केले, परंतु हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे.” ते पुढे म्हणाले, “शिवसेनेने सर्वसामान्य कुटुंबातील सुशिक्षित व कर्तृत्ववान उमेदवारांना न्याय दिला आहे. मतदारांनी त्यांना सेवा करण्याची संधी द्यावी.”
सत्ताधाऱ्यांवर टीका : निधीची दिशाभूल केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर असताना वाईसाठी आणलेले कोट्यवधी रुपयांचे कामे सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला. जनतेची दिशाभूल करण्यात आली.” यावर ते म्हणाले, “या निवडणुकीत जनता नक्कीच उत्तर देईल आणि वाई शहरातील प्रलंबित प्रश्नांना योग्य न्याय मिळवून देईल. या बैठकीस शिवसेना संघटक युवराज यांना कोंढाळकर व सर्व उमेदवार उपस्थित होते व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


 


पश्चिम भागाचे वाई शहरांमध्ये सर्वात जास्त मतदान असून त्यामुळे मुळे प्रवीण शिंदे यांची उमेदवारी धक्कादायक निकालाची नोंद करू शकते वाई शहरांमध्ये पश्चिम भागातून येणारा मतदार व वाई शहरांमध्ये राहिला असलेले नागरिक हे पश्चिम भागातील बऱ्यापैकी असल्याने धक्कादायक निकाल समोर येऊ शकतो  


- शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र भिलारे