NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

दिशाभूल करणाऱ्यांच्या नादी लागू नका - आमदार मकरंद पाटील

अंदोरी, पाडेगाव येथे विकासकामांचे उद्‌घाटन

86lonanad.jpg

लोणंद, दि. ७ – खंडाळा तालुक्‍यात झालेल्या औद्योगिकीकरणामुळे तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे तर तालुक्‍यात आलेले धोमबलकवडी व नीरा देवघर धरणाचे पाणी यामुळे शेती पाण्याचा बरचसा प्रश्‍न मिटला आहे. नीरा देवघर कालव्याचे पुढील काम व लोणंद – शिरवळ रस्त्याच्या रखडलेला प्रश्‍न महिन्यात मी मार्गी लावणार असून तालुक्‍यातील जनतेने घोषणाबाजी व दिशाभूल करणाऱ्याच्या नादी लागू नये, असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले.
अंदोरी व पाडेगाव ता. खंडाळा येथील विविध विकास कामाचे उद्घाटन व भुमीपुजन आमदार मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी मकरंद आबांना कार्यकर्त्यांनी “फुले पगडी” देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा बॅक संचालक दत्तानाना ढमाळ, कृषी सभापती मनोज पवार, जिल्हा परिषद सदस्य दिपाली साळुंखे व उदय कबुले, अश्‍विनी पवार, हणमंत साळुंखे, शंकरराव क्षीरसागर, किशोर साळुंखे,रमेश शिंदे, चद्रकांत पाचे, शिवाजीराव शेळके, डॉ. नितीन सावंत, अजय भोसले, राजेंद्र चव्हाण, धनाजी अहिरेकर, संभाजी घाडगे, हणमंत शेळके, सागर शेळके, जालिंदर रासकर, हरिशचंद्र माने, विजय धायगुडे, रविंद्र क्षीरसागर, गणेश धायगुडे आदी मान्यवराची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आ पाटील म्हणाले औद्योगिकीकरणासाठी शेतजमिनी देण्यास विरोध असणाऱ्या शेतकऱ्याच्या जमिनी न घेता औद्योकीकरणाचा प्रश्‍न मार्गी लावणार असून तालुक्‍यात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. देवघर कालव्याचे वाघोशी पासुन पुढील काम व लोणंद – शिरवळ रस्त्याच्या रखडलेला प्रश्‍न कोणत्याही परस्थितीत महिन्यात मी मार्गी लावणार असुन तालुक्‍यातील जनतेने अपप्रचार करणाऱ्याच्या भुलथापाना बळी पडु नये.

यावेळी दत्तानाना ढमाळ, मनोज पवार, दिपाली साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. बाळुभाऊ ननावरे, डॉ नानासो हाडंबर, किसन ननावरे, शंकरराव धायगुडे, यशवंत खुंटे, काळुराम होळकर, पोपट दगडे, गजानन धायगुडे, दादासो धायगुडे, भिकु ननावरे, नवनाथ ससाणे, नामदेव ननावरे,शमारुती ननावरे, अर्चना होवाळ, वैशाली कारंडे, धनाजी जाधव, प्रदीप होळकर, प्रकाश दगडे, तानाजी ठोबंरे, सोमनाथ नरुटे, मोहन कराडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सुधाकर होवाळ यांनी केले. सूत्रसंचालन गजेंद्र मुसळे यांनी केले. संजय जाधव यांनी आभार मानले.

दैनिक प्रभातवरुन


https://www.youtube.com/embed/