सातारा, दि.२८- निवडणूक खर्च निरीक्षक अल्पेश परमार आज साताऱ्यात आले आहेत. श्री. परमार हे 2007 चे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत.
आज श्री. परमार यांनी शासकीय विश्रामगृहात लोकसभा निवडणुक-2019 च्या अनुषंगाने जिल्ह्याचा आढावा घेतला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर, जिल्हा कोषागार अधिकारी तथा खर्च पडताळणी नोडल अधिकारी धनाजी शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते.
लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्याचा आढावा घेवून श्री.परमार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील करण्यात येणारी कार्यवाही, माध्यम प्रमाणिकरण सनियंत्रण समितीकडील कामकाज तसेच निवडणूक खर्च विषयी सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
लोकशाही दिन आचारसंहिता कालावधीत आयोजित केला जाणार नाही.
सातारा दि.28 -लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 ची आचारंहिता दि.10 मार्च 2019 पासून लागू झालेली आहे.
आचारसंहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करु नये असे आदेश प्राप्त झाले आहेत. सबब तालुका - जिल्हास्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रम लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता कालावधीत आयोजित केला जाणार नाही. असे तहसिलदार सर्वसाधारण जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा यांनी कळविले आहे.
राजकीय
निवडणूक खर्च निरीक्षक अल्पेश परमार साताऱ्यात दाखल


