सातारा: १९- फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत फलटण शहरात गर्दीमारामारी करुन दुखापत, शिवीगाळ, दमदाटी करणारी आणि ग्रामीण भागात शेतक-यांचे शेतातील विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरणाऱ्या ९ जणांच्या टोळीवर तडीपार कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. दरम्यान ४८ तासाचे आंत त्यांना सातारा जिल्हा हद्दीबाहेर गेले पाहिजे असाही आदेश केला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की मारामारी, दुखापत करणा-या टोळीचा प्रमुख नवनाथ तात्याबा कचें, वय-४६ वर्षे, साथीदार विठ्ठल तात्याबा कर्चे, वय -४४ वर्षे, अक्षय नवनाथ कचें, वय -२३ वर्षे, अमित नवनाथ कचें, वय -२० वर्षे, अवधुत विठ्ठल कचें, वय १९ -वर्षे, सर्व रा.अलगुडेवाडी, ता.फलटण, जि. सातारा. अशी टोळी तयार झाली होती त्यांनी फलटण शहरात गर्दीमारामारी करुन दुखापत, शिवीगाळ, दमदाटी करुन नुकसान करणे, सरकारी कामात अडथळा आणुन दरोडा टाकणे, दुखापत करुन शिवीगाळ दमदाटी करणे, असे गुन्हे केलेले आहेत. त्यांना तेजस्वी सातपुते हद्दपारप्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये सातारा जिल्हा हद्दीतुन २ वर्षे (दोन वर्षे) या कालावधी करीता हद्दपार करण्याचा आदेश दिले आहेत.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत शेतक-यांचे शेतातील विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरणा-या टोळीचा प्रमुख रामदास विनायक मंडले, वय-४६ वर्षे, टोळी सदस्य गणेश श्रीमंत माने, वय -१९ वर्षे, आर्यन शंकर कांबळे, वय -१९ वर्षे, रोहीत ऊर्फ भैय्या प्रकाश लोंढे, वय -२२ वर्षे, सर्व रा. सांगवी मायनर, ता.फलटण, जि. सातारा. अशी टोळी तयार झाली होती त्यांनी फलटण परिसरातील शेतक-यांच्या विहीरीवरील पाण्यातील मोटारी चोरीचे गुन्हेनकेलेले आहेत. त्यांना तेजस्वी सातपुते हद्द पारप्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये सातारा जिल्हा हद्दीतुन ०१ वर्षे (एक वर्षे) या कालावधी करीता हद्दपार केले बाबतचा आदेश केला आहे.
वरील दोन्ही टोळयांना वेळोवेळी सुधारणेची संधी देवुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधुन त्यांचेवर कडक कारवाई करणे करीता मागणी होत होती.त्यामुळे त्यांचे कडुन फलटण तालुका हद्दीत हिंसक घटना घडुन भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवु नये म्हणुन वरील दोन्ही टोळीतील ९ इसमांना हद्दपार करणे बाबत फलटण शहर व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे कडुन तेजस्वी सातपुते, हद्दपारप्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे प्रस्ताव सादर केले होते. सदर हद्दपार प्रस्तावाची सुनावणी होवुन पोलीस अधीक्षक यांनी वरील प्रमाणे हद्दपार आदेश केलेले आहेत. आदेशाची बजावणी झाल्यानंतर ४८ तासाचे आंत त्यांना सातारा जिल्हा हद्दीबाहेर गेले पाहिजे असाही आदेश केला आहे. या कारवाईचे सर्व स्थरातुन समाधान व्यक्त होत आहे. सातारा जिल्हयात अशाच प्रकारे समाजामध्ये भिती,दहशत पसरविणा-या गुंडांचे व चो-या, मारामारी, करणा-यांचे विरुध्द त्वरीत कारवाई करणेत येणार आहे.
सातारा जिल्हा
फलटण शहर, ग्रामीण मधील दोन टोळयांवर तडीपार कारवाई


