NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

फार्म टू मार्केट या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल - चेतना सिंन्हा

41mandeshi.jpg

म्हसवड, दि. 16 – माण देशी फौंडेशनने फार्म टू मार्केट या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून त्यांच्या पेरणीसाठी येणारा खर्च कमी होईल. उत्पादन वाढीसाठी लीन ऍग्रो कंपनी शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांच्या हितासाठी माणदेशीने कंपनीसोबत करार करून प्रायोगिक तत्त्वावर 114 शेतकऱ्यांबरोबर प्रयोग राबविला असल्याचे प्रतिपादन माणदेशीच्या संस्थापिका श्रीमती चेतना सिन्हा यांनी केले.

माणदेशी व लीन ऍग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसवड येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कंपनीचे टीआयएसएसचे एम व्ही अशोक, नाबार्डचे अधिकारी अशोक मेथल, लीन ऍग्रोच्या संचालिका सई गोळे आणि संचालक सिद्धार्थ, वनिता पिसे, विजय सिन्हा, रवी विरकर, वंदना भंनसाळी, रेखा कुलकर्णी आदीच्या उपस्थित प्रतिमा पुजन करण्यात आले
यावेळी चेतना सिंन्हा म्हणाल्या, प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात लीन ऍग्रोच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ तर उत्पादन खर्चात बचत झाली आहे. महिलांनी सुरू केलेल्या माणदेशी किसान उत्पादक कंपनीच्या माध्यमातून वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, तसेच विविध सोयी-सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

अशोक मेथिल, सुबोध अभ्यंकर, लीन ऍग्रोचे संस्थापक सिद्धार्थ दियालानी, सौ.वनिता पिसे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वी शेतकरी सुजाता माने यांचा त्यांच्या गहू पिकाच्या उत्पादनात दुप्पट वाढ झाल्याचे सांगितले.तसेच चंद्रकांत केवटे यांनी त्यांच्या कांदा पिकात झालेली वाढ व उत्पादन खर्चात बचत झाली आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी पल्लवी कुलकर्णी, कुंदन शिनगारे, विजय सिन्हा, माण देशीचे वंदना भंसाळी, ओंकार गोंजारी,लीन ऍग्रीचे सह संस्थापिका सई गोळे, रवी सुर्यवंशी उपस्थित होते.


https://www.youtube.com/embed/