NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

खासदार उदयनराजेंच्या हस्ते स्केटर्स खेळाडूंचा सत्कार

67udyanraje-1.jpg

सातारा, दि. ७ – नुकत्याच बेळगांव येथे आंतरराष्ट्रीय स्केटिग द्रॅकवर तब्बल 48 तास झालेल्या विश्‍वविक्रमामध्ये सातारा जिल्ह्याच्या 10 स्केटर्सनी यशस्वीरित्या विक्रम करून सातारा जिल्ह्याचे नाव गिनीज बुक मध्ये नोंद केले. त्या खेळाडूंचे प्रमाणपत्र नुकतेच इग्लंडवरुन आले असून त्याचे वितरण खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
त्या प्रसंगी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्या सर्व स्केटर्स खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले.

या सर्व खेळाडूंनी साताऱ्याचे नाव आटकेपार नेल्याबद्दल मला या खेळाडूंचा अभिमान गर्व आहे. असे आर्वजून सांगितले. भविष्यात या खेळाडूंना लागेल ती मदत करु असे आश्‍वासनही याप्रसंगी दिले. तसेच मुलांना घडविण्याचे काम प्रशिक्षक विनोद कदम यांचेही मनापासून कौतूक केले. खेळाडु स्वरा सुर्यवंशी, सारा लेले, इश्‍वरि राजेभोसले, श्रावणी साळुंखे, ऐश्‍वर्या कारंडे, वरद कांबळे, सुकृत साळुंखे, अर्नव पाटेकर, अध्ययन बेसके आर्यराज भोसले, देशभरातुन 500 पेक्षा जास्त खेळाडुंनी सहभाग घेतला होता. क्‍लबचे अध्यक्ष क्‍लबचे प्रशिक्षक श्री. विनोद कदम सर खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.


https://www.youtube.com/embed/