म्हसवड : कायम दुष्काळी असलेल्या माण तालुक्यातील रंजल्या, गांजल्या, पिचल्या, दिनदुबळ्या अनाथ, दिव्यांग, आदि समाजघटकांना सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय चांगदेव काटकर यांनी वाढदिवसानिमित्त छावणीतील शेतकरी बांधवांना भोजनदान, अनाथाना धान्य वाटप व माजी सैनिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून एक आदर्श कार्य केले असल्याचे उदगार प.पू.रमेशजी महाराज यांनी काढले.
कुकुडवाड ता.माण येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय चांगदेव काटकर यांच्या वाढदिवसा आयोजित कार्यक्रमात रमेशजी महाराज बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुनिल माने,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, राष्ट्रवादीचे माण खटाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष डॉ.संदिप पोळ,माण तालूका मार्केट कमिटीचे माजी चेअरमन चंद्रसेन काटकर, सरपंच संजय जाधव, बाबा चेअरमन आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना रमेश महाराज म्हणाले माणदेश हा कायम दुष्काळी असलेला भाग आहे. माण तालुक्याला दुष्काळ हा पाचवीलाच पुजला असून, या सततच्या दुष्काळाने शेतकरी, शेतमजूरासह सर्वच बंधू भगिनीं संकटात सापडलेल्या आहेत. बळीराजा कोपला असला तरी माणच्या मातीत माणुसकीचे दर्शन नेहमीच घडते आहे.सामाजिक बांधिलकी जोपासून कार्य करणारी अनेकजण माण तालुक्यात असून दत्तात्रय चांगदेव काटकर हे त्यापैकीच एक आहेत.त्यांनी दुष्काळी परिस्थिती मध्ये आपला वाढदिवसाच्या निमित्ताने इतर खर्च न करता छावणी तील शेतकर्याना अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले, देशसेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून, अनाथाना, अपंग बाधवांना धान्य वाटप केले हे कौतुकास्पद आहे, त्यांच्या या कार्याचा तरूण बांधवांनी आदर्श घ्यावा असे आवाहन रमेशजी महाराज यांनी केले.
या वेळी दत्तात्रय भाऊ काटकर युवा मंचाच्या वतीने स्नेहल वाघमारे,पुर्वा मडे,शुभांगी पुकळे, तेजस वाघमारे, आकांक्षा धनवडे, आदित्य धामनेरकर या गुणवंत विद्यार्थ्यांसह, माजी सैनिक शिवाजी काटकर, महादेव जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तर पांगरी येथील अनाथ मुलांच्या शाळेत धान्य वाटप मुलांना वह्या देण्यात आल्या,
कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक मल्हारी जाधव,बाबा चेअरमन युवा मंचचे अध्यक्ष रमेश काटकर, उपाध्यक्ष निखिल काटकर, सदस्य लक्ष्मण कोकरे,राघू पुकले, दादासो पुकळे, ज्ञानेश्वर काटकर, सुरज तुपे, किरण काटकर स्वप्निल काटकर उपस्थित होते.
सातारा जिल्हा
वाढदिवसानिमित्त छावणीतील शेतकरी बांधवांना भोजन, अनाथाना धान्य वाटप


