NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

वंचित कातकरी समाजाला तात्काळ घरकुले द्या

रिपब्लिकन ब्ल्यू फोर्सची झेडपीसमोर निदर्शने

25force.jpg

सातारा, दि. 6– कातकरी समाजासह ज्यांना राहण्यासाठी निवारा नाही, अशा सर्व वंचित घटकांना तात्काळ घरकुले द्या या मागणीसाठी रिपब्लिकन ब्ल्यू फोर्सच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली. दरम्यान, नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा न घेणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई करा अशी मागणी यावेळी प्रदेशाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी केली.

विशेषत: कोरेगाव नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये गेली 60 वर्ष कातकरी समाज रहात आहे. मात्र त्यांना अद्यापराहण्यासाठी घरपाणी अशा मुलभूत सुविधा दिल्या जात नाहीत.कातकरी समाजाला शिरढोण ता.कोरेगाव ग्रामपंचायतीने गायरान जमीन देण्याचा ठराव केला आहे. मात्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून कोणतीही अंमलबजावणी केली जात नाही.
त्याचबरोबर आता कोरेगाव हे नगरपंचायत झाल्यामुळे कातकरी समाजाची अवस्था ना घर का, ना घाट का, अशी झाली आहे. त्यामुळे तात्काळ त्यांना घरकुले देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा न घेणाऱ्या सरंपच व ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी देखील मागणी करण्यात आली. यावेळी किरण बगाडे, विराज बर्गे, नितीन बोतालजी, अविनाश येवले, शशिकांत सातपुते, विनोद बोतालजी, नितीन घोगरे, युवराज घोगरे, नथु पवार, संजय पवार, मंगेश जाधव, शिवाजी वागे, बबन निकम, दत्ता निकम, अंकुश पवार आदी.उपस्थित होते.