सातारा,दि.३०- साता-यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुवर्य बबनराव उथळे उर्फ अण्णा यांची श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. 'महाराज तुमचे आधीच अभिनंदन करतो', अशा शब्दात गुरुवर्य उथळे यांनी शुभेच्छा दिल्या.
शिवाजी उदय मंडळाचे आधारस्तंभ गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या निवासस्थानी जाऊन आज उदयनराजें यांनी सदिच्छा भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पालिकेचे उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, मोहनराव कदम व उथळे कुटुंबिय उपस्थित होते.
वयाच्या ९३ व्या वर्षीही आण्णांचा यांचा आवाज खणखणीत आहे. क्रीडा क्षेत्रात आण्णांचे योगदान मोलाचे आहे. असे गौरवोद्गार उदयनराजे यांनी काढत अारोग्यपुर्ण दिर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
राजकीय
गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या उदयनराजे यांना शुभेच्छा
महाराज तुमचे आधीच अभिनंदन करतो",


