मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा धमाकेदार अॅक्शन चित्रपट ‘पुष्पा’ प्रदर्शनानंतर बराच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने मोठा गल्ला जमवला. त्यानंतर ७ जानेवारीला प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. त्या पाठोपाठ आज १४ जानेवारी रोजी या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार होता. पण चित्रपटाची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने जवळपास ८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच अल्लू अर्जुनची लोकप्रियता पाहाता ‘पुष्पा द राइज’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी अॅमेझॉन प्राइम या ओटीटीवर हिंदी व्हर्जनच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. एक आठवड्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदी भाषेतील ‘पुष्पा’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल ८० कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे जेव्हा ७ जानेवारीला हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये ओटीटीवर प्रदर्शित झाला तेव्हापासून प्रेक्षक याच्या हिंदी व्हर्जनची आतुरतेनं वाट पाहताना दिसत होते. पण आता निर्मात्यांनी हिंदी व्हर्जनच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.
‘पुष्पा’ चित्रपटात अल्लू अर्जुन सोबतच अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. याशिवाय या चित्रपटात फहद फासिल, अनसूया भारद्वाज आणि अजय घोष यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन सुकुमार यांनी केलं आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु हिचं आयटम नंबरही आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे.


