मुंबई, दि. 6 - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. यानंतर IPL स्पर्धा सुरु होणार असून त्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स संघाच्या प्रवासावर नेटफ्लिक्स एक माहितीपट प्रदर्शित करत आहे. या पाठोपाठ धोनीचा आत्तापर्यंतचा प्रवासही त्याच्या चाहत्यांना वेब सीरिजच्या माध्यमातून पाहता येणार आहे. ‘हॉटस्टार’वर ‘रोअर ऑफ द लायन’ या नावाने धोनीवर माहितीपट / वेब सीरिजमधून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
या सीरिजचा टिझर मंगळवारी प्रदर्शित झाला. या टिझरमध्ये ”एक कहानी हैं, जो आपने अब तक नही सुनी” म्हणजेच ”एक कहाणी जी तूम्ही अजून ऐकली नाही”, असे धोनी म्हणताना दिसत आहे.
तसेच या शोच्या सारांशामध्ये म्हटले आहे की, ‘लाखो चाहते मैदानात आणि मैदानाबाहेर धोनीला MSD, कॅप्टन कूल, थाला आणि अजून बरेच काही म्हणत असतात. त्याला प्रोत्साहन देत असतात. धोनीची गोष्ट सर्वांना माहित आहे किंवा तुम्ही असा विचार करता. पण त्याच्याकडे सांगण्यासारखे आणखी काही आहे. त्याच्या जवळच्या मित्रांनाही माहित नसलेली अशी ही दुसरी गोष्ट आहे.
या आशयामुळे आता धोनीबद्दलच्या माहितीपटाची उत्सुकता अधिक वाढली आहे.
Featured Posts
‘मुंबई इंडियन्स’नंतर आता धोनीवरही वेब सीरिज
धोनीकडे सांगण्यासारखे खूप काही आहे, जे जवळच्या मित्रांनाही माहित नाही, असे धोनी या Video मध्ये म्हणत आहे


