इंदुर, दि.५ - घटत असलेल्या समाजाच्या लोकसंख्येमुळे चिंतेत असलेल्या जैन समुदायाने नवदाम्पत्यांना कमीत कमी तीन बाळांना जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नव्हे, तीन बाळांच्या जन्मानंतर जर संगोपनासाठी आर्थिक तुटवडा जाणवू लागला तर समाजाकडून मदत केली जाईल असेही सांगितले आहे. रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात इंदुरमध्ये जैन महासमितीच्या बैठकीत समुदायाच्या जनसंख्येवर चर्चा झाली.
इंदुरमधील दिगंबर जैन यांच्या सर्वोच्च संस्थेने हम दो हमारे तीन असे आवाहन केले आहे. तरूण दाम्पत्यांना अधिकाधिक बाळांना जन्माला घालण्याची विनंती त्यांनी केली आहे. जे दाम्पत्य अधिकाधिक बाळांना जन्माला घालेल त्यांना आर्थिक मदत केली जाईल अशी घोषणा समितीने केली आहे. राष्ट्रीय कौटुंबिक हेल्थ सर्वेक्षणानुसार, जैन समुदायाची लोकसंख्या वाढण्याची टक्केवारी १.२ टक्के आहे. हिंदूमध्ये २.१३ आणि मुस्लिमांमध्ये २.६ टक्के आहे.
दरम्यान, २००१ मध्ये देशाची लोकसंख्या १०२ कोटी होती त्यावेळी जैन समुदायाची संख्या ४२ लाख होती. तर २०११ मध्ये देशाची लोकसंख्या १२० कोटींवर पोहचली आणि जैन समुदायाची संख्या ४४ लाख झाली होती. देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार जैन समुदायाची लोकसंख्या कमी गतीने वाढली आहे.
Featured Posts
हम दो हमारे तीन, जैन समाजाचा नवा नारा
गरज पडल्यास आर्थिक मदतही करणार


