भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये पहिला विश्वकप जिंकला होता. त्यावर आधारीत ’83’ नावाचा चित्रपट लवकरच येणार आहे. कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंह माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तसेच चित्रपटात कपिल देवचा क्रिकेटमधील प्रवास आणि विश्वकपचा विजय दाखवण्यात येणार आहे. क्रिकेट चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
या चित्रपटाच्या शुटिंगसाठी कपिल देव मदत करत आहेत. तसेच रणवीरला क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यासही मदत करत आहेत. आता कपिल देवची २३ वर्षांची मुलगी अमिया ’83’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शिकेचे काम करणार असल्याचे संदीप पाटील यांचा मुलगा चिरागने एका वृत्तपत्राशी संवाद साधताना सांगितले.
‘आम्ही पहिल्यांदाच एकमेकांना भेटलो. अमिरा दिल्लीची आणि मी मुंबईचा. ती माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. रोजच्या ट्रेनिंग सेशनमध्ये देखील ती सहभागी होते. मी कबीरच्या ऑफिला भेट देतो तेव्हा अमिरा नेहमी तिकडे असते’ असे पुढे तो म्हणाला.
चित्रपटाची संपूर्ण टिम काही दिवस धरमशाला येथे राहणार आहे. येथील टिमचे ट्रेनिंग सेशन संपल्यानंतर चित्रपटाच्या शुटिंगसाठी संपूर्ण टिम लंडन आणि स्कॉटलंडला रवाना होणार आहे.
Entertainment
‘८३’ च्या सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा सांभाळतेय कपील देवची मुलगी
भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये पहिला विश्वकप जिंकला होता. त्यावर आधारीत '83' नावाचा चित्रपट लवकरच येणार आहे.


