गुजरातमधील मेहसाणा येथील हिंसाचाराप्रकरणी हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुजरात हायकोर्टाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. निवडणूक येतात आणि जातात, पण भाजपा संविधानाविरोधात काम करत आहे, भाजपाच्या अनेक नेत्यांविरोधात खटले दाखल आहेत, शिक्षा देखील आहे, पण कायदा फक्त आमच्यासाठीच आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
मेहसाणा येथील २०१५ मधील हिंसाचाराप्रकरणी झालेल्या शिक्षेस स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाने शुक्रवारी नकार दिला. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोषी ठरलेल्या गुन्हेगारास निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे हार्दिक पटेल यांचे निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगण्याची चिन्हे आहेत. हायकोर्टाच्या निर्णयावर हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली.
हार्दिक पटेल म्हणतात, मी घाबरणार नाही. सत्य, अहिंसा आणि प्रामाणिकपणे जनतेसाठी आवाज उठवणारच. जनतेची सेवा करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत आणू. पक्षासाठी संपूर्ण गुजरातमध्ये प्रचार करणार. माझी चूक फक्त इतकीच होती की भाजपासमोर झुकलो नाही. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष केल्याचा हा परिणाम आहे.
गुजरात हायकोर्टाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. निवडणूक येतात आणि जातात. पण भाजपा संविधानाविरोधात काम करत आहे. काँग्रेसच्या २५ वर्षांच्या कार्यकर्त्याला निवडणूक लढवण्यापासून का रोखले जात आहे. भाजपाच्याही अनेक नेत्यांविरोधात खटले सुरू आहेत, शिक्षा देखील झाली, पण कायदा फक्त आमच्यासाठीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हार्दिक पटेल निवडणूक लढवण्यास अपात्र का ?
लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार फौजदारी खटल्यात दोन वर्षे वा त्याहून अधिक शिक्षा ठोठावल्या गेलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही. शिक्षेला हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली असल्यास त्या व्यक्तीला निवडणूक लढवता येते. हार्दिक पटेल यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाने नकार दिल्याने हार्दिक पटेल यांचे निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगले आहे.
राजकीय
खटले तर भाजपा नेत्यांवरही, पण कायदा फक्त आमच्यासाठीच - हार्दिक पटेल
"गुजरात हायकोर्टाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. निवडणूक येतात आणि जातात, पण भाजपा संविधानविरोधात काम करत आहे"


