सातारा, दि.२८- पोलीस दलाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांची एक दिवसीय कार्यशाळा 26 मार्च रोजी स्वराज्य मंगल कार्यालय, सातारा येथे पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या कार्यशाळेस अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, मधुकर जोशी, राम पठारे, बाळसाहेब शिंदे-पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमीन मुलाणी आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते म्हणाल्या, पोलीस पाटलांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.मतदारांना निर्भयपणे मतदान करण्यासाठी पोलीस पाटलांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. आचारसंहिता भंगाच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका आचार संहिता भंगाची माहिती महसूल अधिकारी व पोलीस विभागाच्या निदर्शनास आणून द्यावी. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वेळीच रोखण्यास लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यास पोलीस पाटील यांची महत्वपूर्ण मदत होणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
पोलीस पाटील हा जनता व पोलीस विभागामधील दुवा आहे.पोलीस पाटील यांनी कर्तव्य बजावत असताना निपक्षपातीपणे, निर्भयपणे बाजावून जनतेची सेवा करणे महत्वाचे आहे.लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस पाटील यांची महत्वपूर्ण जबाबदारी आहे.कुठेही आदर्श आचार संहितेचा भंग होत असल्यास ते तात्काळ निदर्शनास आणवे, असे अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.
या कार्यशाळेस पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय
आदर्श आचार संहितेचा भंग होत असल्यास माहिती द्यावी- तेजस्विनी सातपुते
पोलीस पाटील यांची कार्यशाळा संपन्न


