बिहार, दि. 23- भाजपा, जनता दल संयुक्त (जदयू) आणि लोकजनशक्ती पार्टी (एलजेपी) यांच्या महायुतीने शनिवारी बिहारमधील महायुतीच्या ४० उमेदवारांची यादी जाहीर केली. ४० पैकी भाजपा आणि जदयू प्रत्येकी १७ तर एलजेपी सहा जागा लढवणार आहे. पाटणासाहिब मतदारसंघातून भाजपाने शत्रुघ्न सिन्हा यांचा पत्ता कट करत रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने तिकीट कापल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवारांची यादी जाहीर केली. बिहारमध्ये भाजपाने जदयू आणि एलजेपी या पक्षांना सोबत घेतले आहे. यात जदयू- भाजपा प्रत्येकी १७ आणि एलजेपी सहा जागांवर निवडणूक लढवणार आहे. पाटणासाहिब या मतदारसंघात भाजपाने विद्यमान खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा पत्ता कट करत त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांचे तिकीटही कापण्यात आले आहे. शाहनवाज हुसैन यांनी गेल्या निवडणुकीत भागलपूर येथून निवडणूक लढवली होती.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना बेगूसराय येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर सारणमधून राजीव प्रताप रुडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपात असूनही नेहमी पक्षाविरोधात भूमिका घेत पक्षनेतृत्वावर टीका केली. मोदी सरकारच्या धोरणावरही त्यांनी वारंवार टीका केली होती. शत्रुघ्न सिन्हा २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत पाटणा साहिब मतदारसंघातून निवडून आले होते. आता भाजपाने तिकीट कापल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा आहे.
राजकीय
बिहारमध्ये ‘एनडीए’चे उमेदवार जाहीर, शत्रुघ्न सिन्हांचे तिकीट कापले
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना बेगूसराय येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर सारणमधून राजीव प्रताप रुडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


