नागपूर, दि. 15- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली आहे. जोशी नागपूरमध्ये जाहीर व्याख्यानासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी जोशी यांचे आशिर्वाद घेतले.
या भेटीदरम्यान जोशी आणि गडकरी या दिग्गज नेत्यांमध्ये विविध विषयावर चर्चा झाली. सेना भाजपा यांची युती झाली हे राज्याच्या हिताचे झाले आहे. आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित काम करायला हवं अशी अपेक्षा जोशी व गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. आता २०१९ च्या निवडणुकीत दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांना नागपुरातच संबोधित करणार आहेत.
१९९६ साली राज्यात युती सत्तेवर आली, तेव्हा जोशी मुख्यमंत्री होते तर नितीन गडकरी यांना सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. जोशी यांनी त्यावेळी गडकरी यांच्यावर विश्वास टाकला होता, व त्याच कारकिदीर्ने गडकरी यांना एक गतिमान मंत्री ही ओळख दिली.
राजकीय
मनोहर जोशींनी घेतली गडकरींची भेट
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली आहे.


