NEWS & EVENTS

राजकीय

सातारा-जावळी कार्यकर्त्यांचा आज मेळावा

53NCP-Logo.jpg

सातारा, दि.२६ – सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचार नियोजनासाठी उद्या मंगळवार, 26 मार्च रोजी सातारा-जावळी तालुक्‍यातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा कल्याण रिसॉर्ट येथे होणार आहे.

याबाबतची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, माजी शिक्षण समिती सभापती सुनील काटकर, शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजू भोसले, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, नगर पालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक, विरोधीपक्ष नेते अशोक मोने व सयाजी शिंदे यांनी संयुक्त पत्रकाद्वारे दिली. त्यांनी सांगितले, लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांना प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा औद्योगिक वसाहतीत, कल्याण रिसॉर्ट येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे. सातारा व जावळी तालुक्‍यातील सर्व आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी-माजी पंचायत सदस्य, आजी-माजी मार्केट कमिटी सदस्य, आजी-माजी खरेदी विक्री संघ सदस्य, आजी-माजी नगरसेवक तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वसंतराव मानकुमरे, सुनील काटकर, राजू भोसले, सौ. माधवी कदम, अशोक मोने व सयाजी शिंदे यांनी केले आहे.