सातारा, दि.4 संपुर्ण सातारा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिहे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित करुन एकहाती सत्ता मिळवली. ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने सरपंच पदासह 9 जागांवर विजय मिळवला तर, एक जागा बिनविरोध झाली.
लोकनियुक्त सरपंचपदी सौ. सुशिला कुंभार (919 मते) यांचा विजय झाला. वार्ड क्रमांक 1 मध्ये ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे महेश जाधव, सौ. सिंधु फडतरे, सौ. हेमा झनकर, वार्ड क्रंमांक 2 मध्ये संदीप फणसे, भानुदास सुतार आणि सौ. नलिनी फडतरे तर, वार्ड क्रमांक 3 मध्ये बजरंग फडतरे आणि सौ. वर्षा फडतरे हे उमेदवार विजयी झाले. या सर्वांचा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पदमसिंह फडतरे, विास फडतरे, हणमंत गोरे, हेमंत सावंत, संजय फडतरे, चंद्रकांत फडतरे, विलास फणसे, सुनिल भोसले, निलेश फडतरे, रामराव जाधव, हणमंत फडतरे, सतपाल फडतरे, नामदेव फडतरे, निलेश देशमुख, अनिल घाडगे, गुलाब मुलाणी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, जिहे ग्रामस्थांनी ज्या विश्वासाने गावचा कारभार करण्याची संधी दिली आहे तो विश्वास सार्थ ठरवत नुतन सरपंच आणि सदस्यांनी गावाचा कायापालट करावा. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी गटतट बाजूला ठेवून सर्वांनी एकोप्याने काम करावे असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आणि गावाच्या विकासासाठी वाट्टेल ते सहकार्य करु, असे आश्वासन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी केले.
सातारा जिल्हा
जिहे ग्रामपंचायतीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाचे निर्विवाद वर्चस्व
सरपंचपदासह ९ जागांवर विजय


